आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोटबंदी : बजाजचे उत्पादन 3 दिवस बंद, व्हेंडर्ससह 500 कोटींचा फटका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - नोटबंदीमुळे ग्रामीण भागातील अर्थचक्र थंडावले आहेच, शिवाय बजाज ऑटोसारख्या मोठ्या ऑटो उद्योगांचेही नुकसान होत आहे. ग्राहकांकडून मागणीच नसल्याने वाळूज येथील बजाजचा प्रकल्प तीन दिवसांसाठी (एक ते तीन डिसेंबर) बंद ठेवण्याचा निर्णय व्यवस्थापनाला घ्यावा लागला. प्रवासी, मालवाहू रिक्षांचे अतिरिक्त उत्पादन झाल्यामुळेही हा निर्णय झाल्याचे समोर आले आहे. यात बजाजच्या व्हेंडर्सना (सुट्या भागांचे पुरवठादार) तब्बल ५०० कोटींचा फटका बसल्याचा दावा करण्यात येत आहे. चार रोजी रविवारची सुटी असल्याने पाच डिसेंबरला प्रकल्प सुरू होणार आहे, अशी माहिती उपाध्यक्ष कैलास झांजरी यांनी दिली.
वाळूज औद्योगिक वसाहतीचे ८० टक्के अर्थकारण बजाज कंपनीवर अवलंबून आहे. नोटबंदीचा सर्वात मोठा फटका बजाजलाच बसला आहे. ग्राहकांकडे रक्कमच नसल्याने त्यांनी खरेदीकडे पाठ वळवली. परिणामी ८ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत झालेले उत्पादन कंपनीबाहेर पडलेच नाही. दुचाकी, प्रवासी व मालवाहू रिक्षांचे अतिरिक्त उत्पादन लक्षात घेता तीन दिवस उत्पादन बंद ठेवण्याचा निर्णय कंपनीने घेतला. यापूर्वी मे महिन्यात पाणीटंचाईमुळे पाच दिवस व्यावसायिक वाहन निर्मिती विभाग बंद होता.
दररोज ५ हजार दुचाकी, २ हजार रिक्षा होतात तयार
वाळूजच्या प्रकल्पात दररोज ५ हजार दुचाकी, २ हजार रिक्षा तयार होतात. या वाहनांना विशेषत: ग्रामीण भागात मोठी मागणी असते. नोटबंदीचा निर्णय होताच ग्रामीण भागातील मागणी ५० तर शहरातील २५ टक्क्यांनी घटली. उत्पादन बंदीच्या निर्णयाने बजाजला अडीच ते तीनशे कोटींचा फटका बसला, तर बजाजला सुट्या भागांचा पुरवठा करणाऱ्यांचे २०० कोटींचे नुकसान झाले.

नोटबंदीचा फटका ...
नोटबंदीमुळे ग्रामीण, शहरी भागातील मागणी कमालीची घटली. मोठ्या संख्येने वाहन पडून असल्याने आम्ही तीन दिवस उत्पादन बंद ठेवले. पाच डिसेंबरपासून प्रकल्प पुन्हा सुरू होत आहे. - कैलाश झांजरी, वरिष्ठ उपाध्यक्ष, बजाज ऑटो समूह
व्हेंडर्सना मोठा फटका
नोटबंदीचा उत्पादनावर परिणाम झाला आहे. बजाजने उत्पादन बंद ठेवल्याने तीन दिवसांत व्हेंडर्सना किमान २०० कोटींचा फटका असावा, असा प्राथमिक अंदाज आहे.
मिलिंद कंक, उद्योजक
बातम्या आणखी आहेत...