आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजरीला सोन्याचा भाव, दर पोहोचले 2 हजारांवर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (13 नोव्हेंबर) बाजरीला क्विंटलमागे 2 हजार 13 रुपयांचा दर मिळाल्याने शेतकर्‍यांच्या आनंदाला उधाण आले आहे. गव्हाला 2 हजार ते 2300, ज्वारीस 1500 ते 1800 रुपयांचा दर मिळाला. ज्वारीपेक्षा बाजरीला अधिक दर मिळाल्याचे प्रथमच घडले आहे.

सुरुवातीला शेतकरी बाजरी, ज्वारीचे मुख्य पीक घेत. सध्या त्यांचा कल कपाशीकडे वळला आहे. दुसर्‍या क्रमांकावर मका त्यानंतर बाजरीला प्राधान्य देण्यात येत आहे. जिल्ह्यात खरिपात लागवडीखालील 7 लाख 33 हजार 501 हेक्टरपैकी 59 टक्के क्षेत्रावर कपाशीची लागवड झाली. मक्याचे क्षेत्र 23 टक्के तर बाजरीची पेरणी केवळ 5.53 टक्क्यांवर आली आहे. वैजापूरची ख्याती बाजरीचे क ोठार म्हणून आहे. मात्र, एक पीक पद्धत आणि हमी भाव मिळत नसल्याने बाजरी, ज्वारीच्या क्षेत्रात झपाट्याने घसरण झाली. परिणामी बाजारपेठेत मागणी व पुरवठय़ात असमतोल निर्माण झाल्याने बाजरीस विक्रमी भाव मिळत आहे. म्हणूनच 1250 रुपये हमी भावाची बाजरी 2 हजार 13 रुपयांनी विकली गेली.

बाजरी महोत्सव घेणार
बाजरीला नव्याने महत्त्व प्राप्त झाले आहे. गहू, ज्वारीपेक्षा बाजरीत पोषणमूल्य अधिक असल्याचे सिद्ध झाले आहे. तसेच दुष्काळातही तग धरणारे हे पीक आहे. 1980 मध्ये गंगापूर, कन्नड, वैजापूर तालुक्यात 1 लाख 80 हजार हेक्टरवर विक्रमी पीक घेतले जात होते. आता 25 ते 30 हजार हेक्टरपर्यंत घसरण झाली आहे. क्षेत्रात वाढ व्हावी, यासाठी लवकरच बाजरी महोत्सव घेण्यात येणार आहे. यू. सी. देवळाणकर, तालुका कृषी अधिकारी, वैजापूर