आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीएम कार्यालयातून फोन येताच बकोरिया कार्यमुक्त, अाज स्वीकारणार कार्यभार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- ओमप्रकाश बकोरिया यांना पदमुक्त करण्यास तयार नसलेल्या पुण्याच्या आयुक्तांना गुरुवारी अखेर मुख्यमंत्री कार्यालयातून फोन गेला नंतर बकोरिया यांना दुपारी पदमुक्त करण्यात आले. आता उद्या शुक्रवारी (दि. २६) दुपारी ते सुनील केंद्रेकर यांच्याकडून आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारतील.

केंद्रेकर यांच्याकडील पदभार काढल्यानंतर पुण्याचे अतिरिक्त आयुक्त बकोरिया लगेच रुजू होतील अशी अपेक्षा होती. पण त्यांना पुणे मनपातूनच पदमुक्त करण्यात आले नव्हते. पुणे मनपातील महापौरांची निवडणूक तसेच आगामी काळात स्मार्ट सिटीबाबत होणाऱ्या बैठका यामुळे त्यांना काही काळ पुण्यातच राहू द्यावे, असे तेथील आयुक्त कुणालकुमार यांचे प्रयत्न सुरू होते. पुण्याच्या स्मार्ट सिटीच्या आराखड्यात एकूणच प्रकल्पात बकोरिया यांची भूमिका महत्त्वाची राहिल्याने आता त्यांची गरज आहे, असे कुणालकुमार यांचे म्हणणे होते. इकडे औरंगाबादेत आज केंद्रेकर मनपात आले त्यांनी माहिती घेतली असता बकोरिया यांना रिलीव्ह करण्यात आले नसल्याचे स्पष्ट झाल्यावर त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांशीच बोलत हा विषय काढला बकोरिया यांना लवकर रिलीव्ह करण्याची विनंती केली. यानंतर मुख्यमंत्री कार्यालयातून कुणालकुमार यांना याबाबत कळवण्यात आले शुक्रवारी दुपारी बकोरिया यांना पदमुक्त करण्यात आले. ही स्थिती स्पष्ट झाल्यावर इकडे मनपात सायंकाळी हालचाली सुरू झाल्या. बकोरिया दुपारी वाजेच्या सुमारास पदभार स्वीकारणार आहेत.

नागरिकांची गर्दी
केंद्रेकरयांच्या जागी नवीन आयुक्त कोणत्याही क्षणी रुजू होणार असल्याने आपली कामे मार्गी लागावीत यासाठी आज मनपात गर्दी झाली होती. सकाळी पावणे दहा वाजता मनपात आलेल्या केंद्रेकरांनी विभागप्रमुखांच्या बैठकीला हजेरी लावली तसेच अनेक नगरसेवकांनाही वेळ दिला. महापौर इतर पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतर त्यांनी नागरिकांना भेटीसाठी वेळ दिला. या काळात जेवढी कामे मार्गी लावणे शक्य होते तेवढी त्यांनी केली.