आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसेच्या इच्छुक उमेदवारांची आज नांदगावकरांसमोर हजेरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गटनेते बाळा नांदगावकर, पक्ष सचिव अविनाश अभ्यंकर, संपर्क अध्यक्ष सतीश नारकर व गजानन काळे हे शुक्रवारी औरंगाबादच्या दौर्‍यावर आहेत. विधानसभेसाठी इच्छुक उमेदवार मंडाळासमोर कार्य अहवाल सादर करणार आहेत.
शुक्रवारी वैजापूर, गंगापूर, सिल्लोड, कन्नड येथील शाखाध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी हे नेते चर्चा करणार आहेत.
इच्छुकांमध्ये स्पर्धा
उद्याच्या बैठकीत सुभाष पाटील, दिलीप बनकर, अनिल चंडालिया, डॉ. सुनील शिंदे, बाबासाहेब डांगे, गौतम क्षीरसागर, भास्कर गाडेकर अहवाल सादर करण्याची शक्यता असून शहरात सुमीत खांबेकर, दिलीप चितलांगे, राज वानखेडे, सतनामसिंग गुलाटी, गणेश वानखेडे, संतोष पवार आदी मंडळी अहवाल सादर करतील, अशी चर्चा आहे.