आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाळासाहेबांनी निष्ठावंतांची शिवसेना तयार करून शिवसेनेत राष्‍ट्रभक्त निर्माण केले - राऊत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लासूर स्टेशन - बहुसंख्य राजकीय पक्षाने दलाल व देशद्रोही निर्माण केले, परंतु बाळासाहेबांनी निष्ठावंतांची शिवसेना तयार करून शिवसेनेत राष्‍ट्रभक्त निर्माण केले. शेवटच्या श्वासापर्यंत बाळासाहेबांनी स्वत:साठी काहीच ठेवले नाही, ते फक्त दुस-यांसाठी वाटत गेले. त्यांच्या स्वप्नातील शिवसेना येणा-या निवडणुकीत गटप्रमुखांच्या जोरावर यश मिळाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.


गुरुवारी लासूर स्टेशन येथे बाजार समितीतील गंगापूर-खुलताबाद, वैजापूर, कन्नड, सोयगाव या चार तालुक्यांतील विधानसभा मतदारसंघातील गटप्रमुखांचा मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वंदेमातरम गायनाने करण्यात आली. खासदार चंद्रकांत खैरे यांनी गटप्रमुखच खरा निवडणुकीचा पाया आहे. माझ्या विजयात ग्रामीण भागातील शिवसैनिकांचा मोठा वाटा आहे, असे मत व्यक्त केले. याप्रसंगी आमदार विनोद घोसाळकर, आर.एम.वाणी, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी, माजी आमदार अण्णासाहेब माने, महिला आघाडीच्या आनंदीताई अन्नदाते यांचीही भाषणे झाली.