आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागाल तेवढय़ा बस देतो, सभेसाठी गर्दी जमवा : थोरात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी दोन दिवसांच्या राज्याच्या दौर्‍यावर असून, 5 मार्च रोजी त्यांची औरंगाबादेत सभा होणार आहे. पूर्वतयारीसाठी मंगळवारी शहरात अचानक आलेल्या पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांनी नियोजित सभास्थळांची पाहणीही केली. मागाल तेवढय़ा बसगाड्या पुरवतो, पण सभेला गर्दी जमली पाहिजे, असे फर्मानच थोरात यांनी काँग्रेस पदाधिकार्‍यांना सोडले.

थोरात विशेष
हेलिकॉप्टरने सकाळी शहरात आले. मैदानांच्या पाहणीनंतर सुभेदारी विर्शामगृहावर त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या वेळी जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे, शहराध्यक्ष सय्यद अक्रम, आमदार डॉ. कल्याण काळे, एम.एम. शेख, माजी खासदार उत्तमसिंह पवार, माजी आमदार कैलास पाटील चिकटगावकर, जि.प. अध्यक्ष शारदा जारवाल, चंद्रभान पारखे आदी उपस्थित होते.

गर्दीवर पदाधिकारी गप्प : सभेला कोण किती गर्दी जमवेल, असा सवाल थोरात यांनी कार्यकर्त्यांना केला. तेव्हा गाड्या द्या, आम्ही गर्दी जमवतो, असा आवाज महिलांकडून आला. अन्य गाड्या मिळणार नाही, मागाल तेवढय़ा बस मी देणार आहे, तेव्हा बसमधून जास्तीत जास्त लोक आणा, असे त्यांनी सांगितले खरे; पण त्यावर शहरातील पदाधिकारी वगळता कोणीही होकार दिला नाही. मैदानावर असेल, तेवढीच गर्दी बाहेर रस्त्यावरही दिसावी यासाठी नियोजन करा, असे औताडे यांनी सांगितले.

या जागा बघितल्या
गरवारे क्रीडा संकुल (न्यायालयीन स्थगितीमुळे निर्णय नाही)
महात्मा गांधी मिशनचे मैदान, मराठवाडा सांस्कृतिक मंडळ, आमखास यापैकी मैदान निश्चित होणार आहे. शिवसेनेला सडेतोड उत्तर देण्यासाठी सांस्कृतिक मंडळ निवडावे, अशी सूचना काहींनी केली, तर दिल्लीचे सुरक्षा पथक पाहणी करून गेल्यानंतर निर्णय घेण्याचे ठरले. अयोध्यानगरी मैदान चांगले ठरेल, असेही काहींचे म्हणणे आले.