आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Balasaheb Thorat News In Marathi, Congress, Aurangabad Gurdian Minister

थोरातांकडून पवारांचा ‘गेम’?,काँग्रेस वर्तुळात नवी चर्चा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनीच उत्तमसिंह पवार यांचे तिकीट कापल्याचे चित्र निर्माण करण्यात येत असले तरी प्रत्यक्षात उत्तमसिंह यांचा ‘गेम’ पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केल्याची चर्चा सुरू आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले थोरात यांच्या शब्दाला उमेदवारी देताना मान होता. त्यामुळे दर्डा तसेच फुलंब्रीचे आमदार डॉ. कल्याण काळे यांनी लढण्यास नकार दिल्यामुळे आपला मान पाटील यांच्या पदरात टाकला. त्यामागे गमतीशीर तसेच मानापमानाचे कारण आहे. बाळासाहेब थोरात औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यापासून पवार त्यांच्या भेटीसाठी कधीही सुभेदारीवर किंवा अन्य ठिकाणी गेले नाही. अन्य नेते असल्याशिवाय थोरात यांच्या कार्यक्रमांनाही त्यांनी हजेरी लावली नाही. या प्रकरणी थोरात यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता सायंकाळी उशिरापर्यंत ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.


आपल्याला न मोजणार्‍याला उमेदवारी मिळावी यासाठी शब्द टाकण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे घोटाळ्यात आरोपी असल्याचा ठपका असला तरी नितीन पाटील चालतील, पण पवार नकोत, हे थोरातांनी नक्की केले. त्यामुळेच पवारांचा पत्ता कट झाल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.


तिकीट टाळण्यासाठी दर्डा प्रयत्नशील होते. कोणत्याही परिस्थितीत ज्येष्ठ बंधू विजय दर्डा यांच्याबरोबर त्यांना दिल्लीत दाखल व्हायचे नव्हते. त्यामुळे मला नको, कोणालाही द्या, अशी भूमिका त्यांनी घेतली. या धबडग्यातही त्यांनी पवार यांना उमेदवारी मिळू नये, यासाठीही प्रयत्न केल्याचा विरोधकांचा आरोप आहे. अर्थात पवार यांना उमेदवारी मिळू नये ही दर्डा यांची इच्छा होती, हेही जगजाहीर आहे.