आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघातात गंभीर जखमी झालेले ठाणे काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष बाळकृष्ण पूर्णेकर यांचे निधन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद/ठाणे- ठाणे काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष बाळकृष्ण पूर्णेकर यांचा रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. औरंगाबादेत काँग्रेसचा इंदिरा गांधी जन्मशताब्दी वर्ष सोहळा आटोपून मुंबईकडे निघालेल्या नेत्यांच्या फॉर्च्युनर एसयूव्ही कारला औरंगाबाद-पुणे हायवेवर रविवारी (13 ऑगस्ट) सायंकाळी सहाच्या सुमारास गंगापूर तालुक्यातील भेंडाळा फाट्यानजीक भीषण अपघात झाला होता.

या अपघातात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे सचिव संजय लक्ष्मीकांत चौपाने (60) हे जागीच ठार झाले होते. तसेच ठाणे काँग्रेसचे माजी अध्यक्ष बाळकृष्ण पूर्णेकर आणि नवी मुंबईचे माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे आणि बलदीपसिंह बिश्त हे गंभीर जखमी आहेत.

असा झाला होता भीषण अपघात...
ठाणे जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांची फाॅर्च्युनर कार (एमएच 43 एबी 22) भेंडाळा फाट्यानजीक असताना समोरील दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात दुभाजकाला धडकली.
यानंतर तिला पाठीमागून येत असलेल्या ट्रॅव्हल्स बसने (एमएच 30 एए 9111) धडक दिली होती. यात संजय चौपाने यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघातातील जखमींवर औरंगाबादच्या सिग्मा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सिग्माकडे धाव घेतली. चापणे यांचा मृतदेह गंगापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ठेवण्यात आला होता.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... अपघाताची भीषणता दर्शवणारे फोटो...
बातम्या आणखी आहेत...