आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पीएचडी प्रकरणासाठी चौकशी समिती गठीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने स्वायत्ततेच्या नावाखाली पीएचडीचे प्रवेश सुरू केले आहेत. विद्यार्थ्यांकडून संशोधन करून घेत पीएचडी पदवीही प्रदान केली. ही सर्व प्रक्रिया महाविद्यालयातही करण्यात येते, मात्र विद्यापीठाकडून त्यासाठी प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. विद्यापीठाला अंधारात ठेवून परस्पर पीएचडी पदवी वितरित केल्याच्या प्रकरणाच्या चौकशीसाठी व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. शिवाजी मदन यांच्या अध्यक्षतेत समिती गठित करण्यात आली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची शनिवारी (३० मे) कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या अध्यक्षतेत विद्या परिषदेची बैठक झाली. यात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संलग्नीकरण आणि स्वायत्ततेच्या संदर्भात सदस्यांनी आक्षेप घेतले. स्वायत्ततेचा आधार घेत अभियांत्रिकी महाविद्यालयाने विद्यापीठाला कळवता परस्पर पीएचडी हा सर्वोच्च अभ्यासक्रम सुरू केला. त्यामुळे सर्व विद्याशाखांच्या अधिष्ठातांसह डॉ. मदन समिती आता या प्रकरणाची चौकशी करणार आहे. गाइडशिप कुणी दिली, गाइड कोण आहेत, त्यांचे निकष कुणी ठरवले आदींसंदर्भात समिती आता माहिती घेणार असल्याची माहिती आहे. त्यानंतर गरज असल्यास महाविद्यालयाची संलग्नता रद्द करण्याचाही विचार केला जाईल, असे आश्वासन कुलगुरूंनी बैठकीत सदस्यांना दिले. जयप्रकाश नारायण अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीश सातव यांच्याकडे कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयांत शिकवण्यासाठी मान्यता आहे. एका शिक्षकाकडे दोन मान्यतापत्र असल्याची बाब बैठकीसमोर आल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्याचाही निर्णय घेण्यात आला.
विद्यापीठाचे विभाजन करून उस्मानाबाद येथे स्वतंत्र विद्यापीठ स्थापनेच्याभूमिकेच्या विरोधात शनिवारी विद्यापीठ कृती समितीतर्फे आंदोलन करण्यात आले.

विद्या परिषदेची बैठक सुरू असताना बाहेर तीव्र निदर्शने करण्यात आली. किशोर वाघ, अरुण शिरसाट, सचिन बोर्डे, युवराज धबडगे, देवानंद वानखेडे, राहुल तायडे, सचिन निकम, मोहन सौंदर्य आदींचा आंदोलनात सहभाग होता. कुलगुरूंनी या वेळी आपणही विभाजनाच्या विरोधात असल्याचे स्पष्ट केले.
बातम्या आणखी आहेत...