आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जाहिरात ९० जागांची, भरणार ४५, शासन निर्णय पायदळी तुडवला जात असल्याचे लक्षात आल्यावर सारवासारव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ८५ प्राध्यापकांच्या रिक्त जागा भरण्यासंदर्भात शनिवारी (२ जुलै) जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर भरती प्रक्रियेबाबत शासन निर्णय पायदळी तुडवला जात असल्याचे लक्षात आले. त्यामुळे सारवासारव करत गरज पडल्यास निम्म्याच जागा भरण्याची तयारी होत आहे. दरम्यान, काही जागांसाठीचे स्पेशलायझेशन कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी स्वत:चा अधिकार वापरत बदलले आहे.
विद्यापीठात २५९ शिक्षकांच्या मंजूर पदांपैकी १७४ कार्यरत आहेत. आता प्रशासनाने १८ प्राध्यापक, २८ सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापकांच्या ३९ जागांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या जागांसाठी जाहिरात काढली आहे. १० ऑगस्टपर्यंत आॅनलाइन, तर १९ ऑगस्टपर्यंत ऑफलाइन अर्ज करता येतील. जाहिरात प्रसिद्ध होण्यापूर्वीच फुटल्याने भरती प्रक्रियेत अडथळे निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच जून २०१५ चा शासन निर्णय समोर आला. त्यानुसार रिक्त ९० जागांपैकी फक्त निम्म्या म्हणजेच ४५ जागाच भरण्यास अनुमती आहे. सततच्या दुष्काळी पार्श्वभूमीवर त्या वेळी तसा निर्णय झाला होता. दरम्यान, विद्यापीठाने उच्च तंत्रशिक्षण पत्र लिहून किमान ७५ टक्के जागा भरण्याची परवानगी मागितली होती. पण उपसचिव सिद्धार्थ खरात यांनी आधीच्या निर्णयावर ठाम राहत ५० टक्के जागा भरा असे डिसेंबर २०१५ रोजी विद्यापीठाला पत्राद्वारे कळवले आहे. दुरूस्ती आदेशही जानेवारी-२०१६ मध्ये काढला होता. तरीही सर्वच जागा भरण्यास जाहिरात दिली. ही गंभीर चूक असल्याचा आरोप भाविसेचे विद्यापीठ संघटक तुकाराम सराफ यांनी केला आहे.

प्राधान्य क्रमाने जागा भरू : जाहिरातकाढली म्हणजे सर्वच जागा भरल्या जातील, असे होणार नाही. आता पाऊस चांगला झाल्यास शासनाचा निर्णय बदलूून सर्व जागा भरण्याची परवानगी मिळू शकते. भरती प्रक्रियेला काही महिने लागतील. तोपर्यंत सर्व जागा भरण्याची परवानगी नाही मिळाली तर प्राधान्यक्रमाने निम्म्या जागा भरू. स्पेशलायझेशन बदलण्यासंदर्भात व्यवस्थापन परिषदेत निर्णय झाला होता. कुलगुरूंनाही त्यात बदलाचा अधिकार असल्याचे कुलसचिव दिलीप भरड म्हणाले.

परस्पर स्पेशलायझेशन बदलले
विभागप्रमुख आणि विभागीय समितीकडून प्राध्यापकांच्या विषयनिहाय शिफारशी घेण्यात आल्या होत्या. मात्र, जाहिरात प्रसिद्धीपूर्वी कुलगुरूंनी बहुतांश विषयांचे स्पेशलायझेशन बदलल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. रसायनशास्त्रात प्राध्यापक, सहयोगी आणि सहायक प्राध्यापकासाठी अर्ज मागवले. येथे फिजिकल केमिस्ट्रीच्या शिक्षकांची गरज असताना जाहिरातीत बायो ऑर्गेनिक असा बदल केला आहे. इंग्रजी, पाली अँड बुद्धिझम आदींसह विविध विभागांत असे परस्पर बदल झाले आहेत. याबद्दल विभागप्रमुखांनी नाराजी व्यक्त करत संभाव्य उमेदवारांना डोळ्यासमोर ठेवून हे बदल केल्याचा दावा केला आहे.
बातम्या आणखी आहेत...