आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदवीची 4 तर पदव्युत्तरची २० ऑक्टोबरपासून परीक्षा सुरू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षांना (यूजी) तर पदव्युत्तर (पीजी) परीक्षांना २० ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. यंदाही प्रवेश प्रक्रिया लांबल्याने महाविद्यालय आणि विद्यापीठांच्या विविध शैक्षणिक विभागांत ९० दिवसांचे अध्यापन झाले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा ताण येण्याची शक्यता आहे.
कुलगुरू डॉ. चोपडे यांनी १० मे रोजी पत्रकार परिषद घेऊन अकॅडमिक कॅलेंडर जाहीर केले होते. पदव्युत्तर पदवीच्या अभ्यासक्रमांना सीईटीचे बंधन घालून जून ते १४ जूनपर्यंत सर्व प्रवेश आटोपतील असे त्यांना अपेक्षित होते. शिवाय १५ जूनपासून सत्रारंभ आणि २७ जूनपासून प्रत्यक्षात अध्यापनाला सुरुवात होईल, असाही त्यांचा प्रयत्न होता, पण प्रवेश प्रक्रिया ऑगस्टपर्यंत सुरू होती. त्यामुळे तासिकांना उशिरा सुरुवात झाली. बीसीयूडी संचालक डॉ. सतीश पाटील यांच्या निर्देशानुसार तर विद्यापीठातील शैक्षणिक विभागांच्या रिक्त जागांवर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत प्रवेश देण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे विद्यापीठाचे अध्यापन ३० ते ४० दिवसांचेच होत आहे. महाविद्यालयांच्या पीजी विभागाचे चित्रही यापेक्षा वेगळे नाही. यूजीसीने ९० दिवसांची शिकवणी झाल्याशिवाय परीक्षा घेण्यास मज्जाव केला आहे. अकॅडमिक कॅलेंडरनुसार २५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबरपर्यंत वीस दिवसांच्या दिवाळी सुट्या आहेत. २० ऑक्टोबरला परीक्षा सुरू झाल्यास मध्येच २० दिवसांच्या सुट्या देऊन पुन्हा उर्वरित पेपर घेण्याची कसरत परीक्षा विभागाला करावी लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, पीजीचे काही पेपर दिवाळी सुट्यांमध्येच घेऊन नोव्हेंबरपर्यंत परीक्षा संपवण्याचा परीक्षा विभागाचा मानस आहे.

यंदा विलंब शुल्क घेतले नाही : बी.ए.,बी.कॉम, बीएस्सी, बीसीएस, बीसीए, बीबीए आदींसह सर्व प्रकारच्या पदवी परीक्षांना ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. २५ ऑक्टोबरपर्यंत पदवीच्या परीक्षा घेतल्या जातील. परीक्षा अर्ज भरून घेण्यासाठी विद्यापीठाने २० ऑगस्ट ते १४ सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली होती. २४ दिवसांचा पुरेसा कालावधी असल्यामुळे यंदा परीक्षा नियंत्रक डॉ. डी. एम. नेटके यांनी विद्यार्थी हितासाठी विनाविलंब शुल्कासह अर्ज स्वीकारले आहेत. १४ सप्टेंबरनंतर एखाद्या विद्यार्थ्याची मोठी अडचण असल्यास त्याला पंधराशे रुपये शुल्क अाकारून परीक्षेला बसू दिले जाईल, असेही डॉ. नेटके यांनी स्पष्ट केले.

^द्वितीय आणितृतीय वर्षातील विद्यार्थ्यांचा काही प्रश्न नाही. त्यांचे अध्यापन वेळेत सुरू झाले. पण प्रथम वर्षाचे प्रवेश लांबल्यामुळे त्यांना फटका बसतो. अभ्यासक्रम ६० दिवसांतही पूर्ण करता येतो. पण विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा ताण येतो. पण अडचणीमुळे असे निर्णय घ्यावे लागतात. -डॉ.एस. जी. गुप्ता, संचालक, गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन्सिक सायन्स.

^दिवाळीच्या सुट्यासंपल्यानंतर काही पेपर घ्यावे लागणार आहेत. यूजीची अडचण नाही, पण पीजीचे काही पेपर दिवाळी सुट्यांनंतर घेतले जातील. त्याशिवाय डीएड, बीएड, एमएड, बीपीएड, एमपीएड, विधीचे आणि एमबीए प्रथम सत्रांचे प्रवेश शासनाने केले असल्यामुळे परीक्षा नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात होतील. -डॉ.डी. एम. नेटके, परीक्षा नियंत्रक

बातम्या आणखी आहेत...