आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद विद्यापीठातील रकमांचा ताळमेळ जुळेना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या 2012-13 या आर्थिक वर्षाच्या जमा-खर्चाच्या नोंदीमध्ये कुठलाही ताळमेळ बसत नाही. अनुदान नोंदणी रजिस्टरमधील आकडेवारी जुळत नाही तसेच विद्यापीठाने बँक खात्याचे जुळणीपत्रकच तयार करून घेतले नाही, असे गंभीर आरोप लेखा परीक्षणाच्या अहवालात आहेत. विद्यापीठाचा 2012-13 या वर्षाचा स्वतंत्र उर्वरित. पान 7

वैधानिक लेखा परिक्षण अहवाल राज्य विधिमंडळात नुकताच सादर झाला. औरंगाबादच्या इंदापुरकर आणि मुंदडा या सनदी लेखपाल फर्मने बनवला आहे. नॅकचा ‘अ’ दर्जा प्राप्त असलेल्या, विविध 38 विभाग कार्यरत असलेल्या आणि 32 नामवंत कुलगुरूंची परंपरा लाभलेल्या या विद्यापीठाच्या वार्षिक लेख्यांमध्ये त्रुटी आढळल्याने अब्रुची लक्तरे वेशीवर टांगली आहेत. हजारो-लाखो विद्यार्थ्यांची 60 वर्षे परिक्षा घेणारे विद्यापीठ स्वत:च्या जमाखर्चाचा हिशोब ठेवण्यात सपशेल नापास झाल्याचे या अहवालामुळे चव्हाट्यावर आले आहे.

मागील रकमा कुठे आहेत?
जमा खाते, इतर शिल्लक खाते, इतर संपत्ती, शिष्यवृत्ती, अनुदान, सरकारी प्रलंबीत रकमा इत्यादी आरंभीक रकमा ताळेबंदात कायम ठेवल्या आहेत. त्यामुळे मागील वर्षीच्या रकमांचा तपशील समजत नाही, यावर सदर अहवालात बोट ठेवण्यात आले आहे.

अहवालात ठपका
- विविध विभागांची स्थावर व जंगम मालमत्ता रजिस्टर तसेच साठा रजिस्टरप्रमाणे जुळून येत नाही.
- स्थावर मालमत्तेवरील चालू वर्षीचा घसारा मागील वर्षीच्या किमतीवर आधारित. तो मालमत्ता खरेदी केल्याच्या दिवसापासून आकारला जायला हवा.
- विविध प्रकारच्या अग्रिम खात्यावर मोठय़ा रकमा आरंभीची शिल्लक दाखवतात. त्यांचा कुठेही मेळ नाही.
- नोंदणी रजिस्टरमधील नोंदीशी खर्चाच्या नोंदी जुळत नाहीत. सॉफ्टवेअरमधील नोंदी रजिस्टरमध्ये, तर रजिस्टरमधील नोंदी सॉफ्टवेअरमध्ये नाहीत.

ताकीद अशी
- अग्रिम खात्यातील रकमांचा सुसंगत मेळ घालावा. बँक खात्यांचे जुळवणी पत्रक करावे.
- विशिष्ट अनुदानाची रक्कम स्वतंत्र खात्यात जमा ठेवावी. न वापरलेली रक्कम एकत्रित खात्यावर जमा राहावी.
- प्रत्येक अनुदानाचे खाते स्वतंत्र ठेवावे.
(फोटो - औरंगाबाद विद्यापीठाचे संग्रहित छायाचित्र)