आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीईटीत अव्वल येऊनही प्रवेश नाकारला,एमपीएडच्या प्रवेशासाठी पवन गोरेची छळवणूक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- राज्य आणि राष्‍ट्रीय स्तरावर अनेक कुस्ती स्पर्धांमध्ये प्रावीण्य प्राप्त खेळाडू, आवश्यक अर्हतेतही पात्र, पदव्युत्तर शिक्षणासाठी घेण्यात आलेल्या पूर्वपरीक्षेत अव्वल असतानाही पवन गोरे या विद्यार्थ्याला विद्यापीठातील शारीरिक शिक्षण विभागाने एमपीएडसाठी प्रवेश नाकारला. वारंवार विनंत्या करूनही प्रवेश न मिळाल्याने आणि प्रवेश नाकारल्याचे कारण कळू न शकल्याने निराश होऊन पवन गोरेने अखेर उपोषणाचे शस्त्र हाती घेतले आहे. तो 17 फेब्रुवारीपासून विद्यापीठात उपोषणाला बसला आहे. शारीरिक शिक्षण विभागाचे विभागप्रमुख डॉ. संजय चंद्रशेखर हे आपणाला हेतुपुरस्सर त्रास देत असल्याचा आरोप त्याने‘दिव्य मराठी’शी बोलताना केला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील शारीरिक शिक्षण विभागाकडून 2 ऑगस्‍ट 2013 रोजी आयोजित एमपीएडच्या पूर्वपरीक्षेत (सीईटी) पुण्याचा पवन गोरे सहभागी झाला होता. 2 2013 रोजी एमपीएड सीईटी परीक्षेचा त्याचा निकाल 3 ला संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल, असे त्या वेळी विभागाकडून सांगण्यात आले. मात्र, अनेकदा चालढकल करूनही निकाल घोषित करण्यात आला नाही किंवा त्याबाबत कोणतीही सूचना देण्यात आली नाही. अखेर पवनने 27 ऑगस्‍टला पुण्यातून थेट विद्यापीठात धाव घेतली. आल्यावर त्याला धक्काच बसला. अ‍ॅडमिशन प्रक्रिया 19 आणि 20 लाच पार पडल्याचे त्याला सांगण्यात आले. त्याने याबाबत विभागप्रमुखांकडे विचारणा केली. त्यांनी दखल घेतली नाही. प्रवेशासाठी पवनने विभागप्रमुख, बीसीयूडी संचालक, कुलगुरू आदींकडे मदत मागितली. मात्र, सर्वांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले.
सीईटीत अव्वल :
सप्टेंबरमध्ये पवनने विभागाकडून सीईटीच्या निकालाची प्रत मिळवली. कारण सीईटीच्या निकालात तो प्रथम आला असतानाही त्याला प्रवेश देण्यात येत नसल्याने तो प्रचंड अस्वस्थ झाला.
विभागप्रमुखाच्या पायाही पडला :
4 सप्टेंबर 2013 रोजी विभागप्रमुख भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या कार्यालयात बसले होते. त्या वेळी मी पुन्हा एकदा त्यांना प्रवेशासाठी विनंती केली. नाइलाज म्हणून मी पायासुद्धा पडलो. त्यांच्यावर काहीच फरक पडला नाही. इतकेच सोडा, माझ्या समोर 27 2013 रोजी दोन परराज्यांतील विद्यार्थ्यांना त्यांनी प्रवेश दिला. मी हताशपणे बघत राहिलो, अशी प्रतिक्रिया पवन गोरेने व्यक्त केली.
केवळ आश्वासने
मी पाच दिवसांपासून विद्यापीठात उपोषणाला बसलो आहे. विद्यापीठाचे अधिकारी केवळ भेट देऊन जात आहेत, परंतु माझ्या प्रवेशाबाबत अद्याप कोणीही ठोस पावले उचलत नाहीत. आधीच वर्षभरापासून त्रस्त असूनही विद्यापीठाला दया येत नाही.
पवन गोरे, विद्यार्थी कारवाई केली जाईल
तो विद्यार्थी प्रवेशप्रक्रिया पार पडल्यानंतर 2 सप्टेंबरला प्रवेश मागण्यासाठी आला होता. सत्र संपत आल्याने त्याला प्रवेश दिला गेला नाही. या प्रकरणी अन्य काही विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्याप्रकरणी विभागप्रमुखांवर योग्य ती कार्यवाही केली जाईल. पवन गोरेला आता प्रवेश देणे नियमात बसत नाही.
डॉ. सुरेशचंद्र झांबरे, बीसीयूडी संचालक