आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नामविस्तार दिनानिमित्त विद्यापीठ परिसरात संस्था, संघटनांतर्फे अभिवादन

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिनानिमित्त विविध संस्था, संघटनांच्या वतीने डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. तसेच वेगवेगळे उपक्रमही घेण्यात आले. नागरिक या कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते.
भारतीय दलित कोब्रा - संघटनेतर्फे विद्यापीठ गेटसमोरील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला व नामांतर शहीद स्तंभाला संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. विवेक चव्हाण, मराठवाडा अध्यक्ष अशोक बोर्डे यांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले. पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालयात सायंकाळी जाहीर सभेत मान्यवरांनी मार्गदर्शन केले. जिल्हाध्यक्ष बाबासाहेब आस्वार, विजय प्रधान, राजेंद्र दाभाडे, अभय चव्हाण, अमोल त्रिभुवन, आनंद बोर्डे, रवीसिंह राजपूत, राजू कदम यांची उपस्थिती होती.
पँथर्स रिपब्लिकन पार्टी - संघटनेच्या वतीने शहराध्यक्ष पंकज बोड यांच्या अध्यक्षतेखाली वाहन रॅली काढण्यात आली. प्रेमनाथ सातपुते, मनोज वाहूळ, नितीन साळवे यांच्या नेतृत्वाखाली कबीरनगर येथून विद्यापीठ गेटपर्यंत रॅली काढण्यात आली. विद्यापीठ गेट येथे मानवंदनेचा कार्यक्रम झाला. यात आनंद गवळी, विजय भिसे, गौतम शिंदे, सचिन इंगळे, मनोज गवळी यांचा सहभाग होता.
तथागत प्रतिष्ठान - विद्यापीठ गेट येथील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला प्रतिष्ठानतर्फे पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. या वेळी अध्यक्ष सुनील भुईगड, उपाध्यक्ष रवी नन्नावरे यांचे भाषण झाले. या प्रसंगी अशोक सोनवणे, अनिल गडवे, सुरेश मगरे, राजू भिंगारदेव, मधुकर रगडे, संजय नाडे, भिकन, संतोष साबळे यांची उपस्थिती होती.
रिपब्लिकन बहुजन फोर्स - संघटनेतर्फे संघटना प्रमुख मुकुंद दाभाडे यांच्या उपस्थितीत पंचशील व त्रिशरण घेऊन विद्यापीठ गेट येथील डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यास हार अर्पण करण्यात आला. तसेच नामविस्तारासाठी शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या वेळी शांतीलाल दाभाडे, पंडित राठोड, आनंद मुठे, विष्णू लांडगे, गंगाराम दाभाडे, परसराम चक्रे, अनिल वाघमारे, माणिक पवार, कल्याण म्हस्के, राहुल बोबडे, कल्याण गायकवाड, अनिल शेजवळ यांची उपस्थिती होती.
आंबेडकरनगर शाखा - शाखेच्या वतीने आंबेडकरनगर येथील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. या वेळी उपविभागप्रमुख नितीन साळवे, शाखाप्रमुख राहुल घोरपडे, प्रकाश जाधव, अशोक भगुरे, गौतम पगारे यांची उपस्थिती होती.
शहर प्रगती आघाडी - आघाडीच्या वतीने विद्यापीठ गेट येथे आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी शहरप्रमुख विनोद बनकर, अनिल भिंगारे, बाळू गंगावणे, प्रकाश बनकर, भाऊसाहेब निकाळजे यांची उपस्थिती होती.
मिलिंद मल्टिपर्पज हायस्कूल - मिलिंद मल्टिपर्पज हायस्कूल येथे नामविस्तार दिन साजरा झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या चित्रा मोहरीर होत्या. प्राचार्य ज्ञा. रा. पंडित यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी विद्यार्थ्यांनी भीमगीते सादर केली. तसेच नामविस्तार दिनानिमित्त भाषणे केली. पाहुण्यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
भारतीय दलित पँथर - संघटनेतर्फे डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला तसेच नामांतरातील शहिदांना अभिवादन करण्यात आले. या वेळी पँथर नेते संजय जगताप, शांतीलाल शर्मा, किशोर गडकर, अनिल उगले, सुनील घाटे यांची उपस्थिती होती.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना - विद्यापीठ गेट येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष सतनामसिंग गुलाटी यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी शिवाजी वीर, अशोक पवार, सुधाकर चांदणे, अभय मांजरमकर, संतोष वडमारे यांची उपस्थिती होती.