आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठ भरती प्रक्रियेत घोळ झाल्याचा आरोप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या भरती प्रक्रियेत आलबेल कारभार सुरू असून आणखी एक नवी बाब समोर आली आहे. मुलाखतीसाठी आमंत्रित केलेल्या काही उमेदवारांचा मूळ संवर्गच विद्यापीठाने बदलल्याचा आरोप भारतीय आदिवासी भटके-विमुक्त यूथ फ्रंटने केला आहे. विद्यापीठात सध्या उपकुलसचिव व सहायक कुलसचिव पदांची निवड प्रक्रिया सुरू आहे. यात काही जणांनी हायकोर्टात धाव घेतली होती. यानंतर विद्यापीठाने सोमवारी व मंगळवारी होणार्‍या उपकुलसचिव व सहायक कुलसचिव पदांच्या मुलाखती पुढे ढकलल्या. या प्रक्रियेवर आणखी आक्षेप आले आहेत. सहायक कुलसचिव पदासाठी मुलाखतीला बोलावण्यात आलेल्यांची विद्यापीठाने यादी जाहीर केली. एनटी संवर्गातील उमेदवाराला व्हीजे ‘अ’मध्ये दाखवण्यात आले. या उमेदवारांना मुलाखतीसाठी आमंत्रित करण्यात आले. यावर आदिवासी भटके-विमुक्त यूथ फ्रंट या संघटनेने आक्षेप घेतला. अपात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आल्याचा आरोपही संघटनेचे प्रा. डॉ. वीरा राठोड यांनी केला आहे.