आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीयुक्त केशरी केळी प्रजाती शेतीसाठी ठरू शकते वरदान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- अंदमान व निकोबार बेटे जैवविविधतेसाठी जगात प्रसिध्द आहेत. आता नव्या केळीच्या प्रजातीमुळे अंदमानचे नाव जगात पुन्हा एकदा गाजते आहे. बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या पोर्टब्लेअर केंद्राचे उपसंचालक लालजी सिंह यांच्या अथक प्रयत्नातून हे शक्य झाले. लालजी यांनी केळीची नवी केशरी रंगाची प्रजाती शोधून काढली आहे. या जंगली केळीवर उत्पत्तीसंबंधी अनुवंशिक संशोधन झाल्यास रोग प्रतिकारक व जास्त उत्पादन देणारे केळीचे नवे वाण उपलब्ध होऊ शकते असे मत लालजी यांनी व्यक्त केले.
अनुवंशिक संवर्धनाची गरज
लालजी यांनी सांगितले, केशरी केळीत अनेक उत्तम गुणधर्म आहेत. बियाणांपासून उत्पत्ती, सर्वसाधारण केळीपेक्षा तिप्पट उंची, रोग प्रतिकारक, खाण्यायोग्य व मधुर गर यामुळे याचे अनुवांशिक संवर्धन होणे अत्यंत आवश्यक आहे. लिटल अंदमान बेटावरील कृष्ण नल्ला जंगलात १६ किमी आतमध्ये नव्या मुसा इंडअंदमानेनिसिस केळीची केवळ काही झाडे शिल्लक आहेत. हत्ती, माकडे यांचे हे आवडीचे खाद्य आहे. बेटावरील स्थानीक अदिवासी ही केळी खातात. आम्ही पोर्टब्लेअर येथील केंद्राच्या आवारात काही झाडे जोपासली आहेत. या केंद्रावरील हवामानात या केळी बियाणांची २१ दिवसांत उगवण झाली. जगातील विविध अधिवासात केळीच्या ५२ प्रजाती आहेत, त्यापैकी १५ भारतात आढळतात.
नवी केशरी केळी
उंची : साधारण ११ मीटर
३६ फूट
प्रचलित केळी
उंची : ३ ते ४ मीटर
केळपुष्षांग : सुमारे ३ मीटर लांबीचे लंबकार
शंकू आकाराचे कमी लांबीचे केळपुष्पांग, फ्रुटलक्स कमी
घडाला १८ ते ३० पिवळसर केशरी केळी, गर पिवळसर केशरी.
पिवळ्या केळी, पांढरा गर.
मऊसूत अत्यंत मधुर गरासह बियाणांची रांग.
लागवड : बिया व कंदापासून
बियाणेविरहीत.
लागवड : उतीसंवर्धन, कंदापासूनच करता येते.
बातम्या आणखी आहेत...