आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंजारा समाजाने काढला विराट आक्रोश मोर्चा, आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- हनुमंतखेडा येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून निर्घृण खून करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, आरोपींना वाचविण्यासाठी खोटे पुरावे देणारा डॉक्टर तपासात निष्काळजीपणा करणाऱ्या पोलिसांना सहआरोपी करण्यात यावे आणि या प्रकरणाचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय) कडे देण्यात यावा, अशा मागण्या करत बंजारा समाजाचा विराट आक्रोश मोर्चा शुक्रवारी विभागीय आयुक्तालयावर धडकला. मोर्चातील गर्दी लक्षणीय होती. मराठा क्रांती मोर्चाप्रमाणेच येथेही आंदोलकांनी शिस्तीचे प्रदर्शन घडवले. 

दुपारी वाजता क्रांती चौकातून या आक्रोश मोर्चाला प्रारंभ झाला. मोर्चा पैठण गेट मार्गेे विभागीय आयुक्त कार्यालयावर गेला. तेथील मोकळ्या प्रांगणात रविना राठाेड, अमृता पवार, भारती राठोड या तीन तरुणींनी आपल्या समाजाच्या आक्रोश मोर्चाविषयी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर मुली महिलांनी मागणीचे निवेदन विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्याकडे दिले. या मोर्चात समाजाचे आमदार हरिभाऊ राठोड, आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे, बंजारा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजूसिंग नाईक, प्रल्हाद राठोड, बाबूराव पवार, गुलाबसिंग राठोड, सुकालाल चव्हाण, नंदाताई माथुरे नाशिक, विद्या चव्हाण कल्याण, राजपालसिंग राठोड, नारायण पवार, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेंद्र प्रल्हाद राठोड, जि. प. सदस्य रमेश पवार, अनिल चव्हाण, पृथ्वीराज पवार, संदीप चव्हाण, दत्ता राठोड, मारुती राठोड, गोरख राठोड, डॉ. कृष्णा राठोड, आप्पासाहेब हिवाळे, श्याम मुंडे, सुनील राठोड, डॉ. दिनेश चव्हाण, प्रकाश राठोड, शेषराव चव्हाण, सुरेश जाधव, शंकर राठोड, विजय चव्हाण, हरिभाऊ राठोड आदीनी सहभाग घेतला. 

पुरी-भाजी, पाणी वाटप 
भाजपचेशहर जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड यांनी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर मोर्चेकऱ्यांना पुरी-भाजी पाणी वाटप केले. मोर्चा संपल्यानंतर हा परिसर स्वच्छ केला. या वेळी गटनेता प्रमोद राठोड, राजू राठोड, मंगलसिंग धिल्लन, सुनील गायकवाड, सुभाष साबळे, आदित्य दहीवाल, सुरेश देवमाळी, दीपक कुमावत, अजिंक्य देवतवाल, अमोल सोनटक्के, अनिल बोहते, समाधान धेपे, वैभव येडके, अमोल शेळके, दिनेश महालकर, कवलसिंह बिंद्रा, रोहन जाधव, बंटी बारवाल, उमेश हिवाळे, राहुल रामपूरकर, अक्षय गायकवाड, नीलेश हिवाळे उपस्थित होते. 
बातम्या आणखी आहेत...