आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लष्करी जवानाचे बँक खाते हॅक करून 28 हजार पळवले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - लष्करी जवानाचे बँक खाते हॅक करून भामट्याने ऑनलाइन बँकिंगद्वारे 27 हजार 829 रुपये पळवले. दोन ते आठ जानेवारीदरम्यान ही घटना घडली असून भाऊसाहेब गोविंद भोसले (36, रा. छत्रपतीनगर, वडगाव कोल्हाटी) यांनी क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

अदालत रोडवरील अँक्सिस बँकेत भोसले यांचे खाते आहे. जानेवारी महिन्यात भामट्याने भोसलेंचा खाते क्रमांक हॅक करून खात्यावरून पैसे स्वत:च्या खात्यावर वळते करून घेतले. मागील दोन दिवसांपूर्वी एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले असता ही बाब भोसले यांच्या निदर्शनास आली. त्यांनी सायबर गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गौतम पातारे यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रकाश कुलकर्णी करत आहेत.

भोसले यांच्या खात्यातून लुधियाना येथील एका एटीएममधून पैसे काढण्यात आले आहेत. पंजाब पोलिसांशी संपर्क साधला असून या प्रकरणाचा छडा लावण्याचा प्रयत्न करत आहोत.
प्रकाश कुलकर्णी, पोलिस निरीक्षक.

ऑनलाइन फसवेगिरी वाढली
ऑनलाइन फसवण्याचा घटनांमध्ये सध्या मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. एप्रिल 2012 मध्ये विवेकानंद महाविद्यालयातील बी.कॉम द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्याला त्याच्या मित्राने फसवले होते. स्पर्धा परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज केल्यानंतर पासवर्ड हॅक करून अर्जामध्ये चुका केल्या होत्या. त्यामुळे त्याला परीक्षेला मुकावे लागले.