आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बँक कर्मचाऱ्यांना ६० कोटी रुपये मिळणार, महिनाभरात पैसा खिशात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- राष्ट्रीयीकृत बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. त्यांना १८ ते २० टक्के पगारवाढ मंजूर करण्यात आली आहे. त्याचा फायदा औरंगाबादेतील सुमारे तीन तर मराठवाड्यातील सात हजारपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार आहे. यामुळे पुढील महिनाभरात औरंगाबाद शहरातील बँकांमध्ये काम करणाऱ्यांच्या खिशात किमान ६० कोटी रुपये येणार आहेत.
गेल्या काही वर्षांपासून पगारवाढीच्या मागणीसाठी कर्मचारी संघटना सातत्याने आंदोलन करत होत्या. त्याला यश आले आहे. २५ मे रोजी मुंबईत कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी आणि बँक व्यवस्थापनामध्ये झालेल्या बैठकीत या कराराला अंतिम मंजुरी देण्यात आली. बँक कर्मचाऱ्यांनी एकजुटीने दिलेल्या लढ्यामुळेच हे यश पदरात पडले असल्याचे बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉइज असोसिएशनचे सचिव देवीदास तुळजापूरकर यांनी सांिगतले. तीसमहिन्यांची थकबाकी मिळणार : बँककर्मचाऱ्यांच्या पगारात वर्षाकाठी २२७० कोटी रुपयांनी वाढ होणार आहे. कर्मचाऱ्यांना नोव्हेबर २०१२ पासूनचे एरियर्स (थकबाकी) मिळणार आहेत. तसेच वैद्यकीय खर्चाचा शंभर टक्के परतावा, पंधरा दिवसाची पॅटर्निटी रजाही मंजूर करण्यात आली आहे.
आज विजयोत्सव
कर्मचाऱ्यांचा लढ्याला यश मिळाल्यामुळे बँक कर्मचारी संघटनांच्या वतीने मंगळवारी विजयोत्सव साजरा करण्यात येणार आहे. संध्याकाळी पाच वाजता सिडको येथील एसबीएचच्या झोनल ऑफिससमोर हा विजयोत्सव होणार.
असा होणार फायदा
कॅशिअर,ऑपरेटर, स्पेशल असिस्टंट यांना अडीच ते दहा हजार तर चतुर्थ श्रेणीमधल्या कर्मचाऱ्यांना दोन हजार ते साडेपाच हजार इतकी पगारवाढ होणार आहे. अधिकाऱ्यांना पाच हजार ते वीस हजार पगारवाढ मिळाली आहे. कारकून संवर्गातील कर्मचाऱ्यांना थकबाकीपोटी ८० हजार ते अडीच लाख आणि चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांना ६० हजार ते लाख ८० हजार इतकी रक्कम मिळेल.

लढ्याचा फायदा
- हा एकत्रित लढ्याचा फायदा आहे. बँक कर्मचाऱ्यांना दुसऱ्या, चौथ्या शनिवारी सुटीदेखील मिळणार आहे.
सुनील शिंदे, संघटना सचिव
अनेक सुविधा मंजूर
- यापूर्वी केवळ ज्या बँका नफ्यात आहेत, त्यांनाच पगारवाढ करण्याचा प्रस्ताव संघटनांनी हाणून पाडला. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे.
देविदास तुळजापूरकर
बातम्या आणखी आहेत...