आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Exclusive: महाराष्ट्र बँक फसवणूक: पुणे-नाशकातही रॅकेट, तंत्रज्ञानातील त्रुटींचा फायदा घेत 6 काेटींचा गंडा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे / नाशिक- पैशाची अाॅनलाइन देवाणघेवाण करण्यासाठी सुरू करण्यात अालेल्या ‘युनायटेड पेमेंट इंटरफेस’ (यूपीअाय) अॅपचा वापर करताना बँकेच्या डिजिटल सुरक्षा तंत्रज्ञानांमधील त्रुटींचा गैरफायदा घेऊन महाराष्ट्र बँकेच्या काही खात्यांवर काेट्यवधी रुपयांचा ‘दराेडा’ टाकण्याचे प्रकार अाैरंगाबादपाठाेपाठ राज्यात इतर शहरांतही उघडकीस येत अाहेत.

पुणे जिल्ह्यातील २३ शाखांतील काही खात्यांमधून अशाच प्रकारे ६ काेटी १४ लाख रुपयांची लूट झाली अाहे. याप्रकरणी बँकेच्या फिर्यादीवरून ५० खातेधारकांवर अार्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल केले अाहेत. नाशिकमध्येही दाेन जणांवर गुन्हे दाखल केले असून इतर चाैघांकडून पैसे वसूल करण्यात अाल्याची माहिती सूत्रांनी दिली.  
 
दाेन दिवसांपूर्वीच अाैरंगाबादच्या बँक अाॅफ महाराष्ट्रच्या ४०० खात्यांच्या माध्यमातून हायटेक भामट्यांनी पाच काेटी रुपये लाटल्याचे उघडकीस अाले हाेते. याप्रकरणी दाेघांना अटकही करण्यात अाली अाहे. त्यापाठाेपाठ पुण्यातही असाच घाेटाळा घडल्याची तक्रार बँक अाॅफ महाराष्ट्रचे डेप्युटी झाेनल मॅनेजर निरंजन पुराेहित यांनी शिवाजीनगर पाेलिसांकडे दाखल केली अाहे.  १ डिसेंबर २०१६ ते १८ जानेवारी २०१७ या काळात या गैरव्यवहार झाल्याचे चाैकशीत समाेर अाले अाहे. पुणे, जुन्नर, इंदापूर, अाेतूर, चाकण, घाेडेगाव, तळेगाव ढमढेरे, अाळेफाटा, मढ, मंचर अादी ठिकाणच्या ५० खातेधारकांनी अापसात संगनमत करून ‘यूपीअाय’च्या माध्यमातून बँकांची सहा काेटी १४ लाखांची फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद केले अाहे. या खातेदारांची नावेही पाेलिसांकडे देण्यात अाली अाहेत. दरम्यान, या प्रकरणाचा तपास पाेलिसांनी  सायबर गुन्हे शाखेकडे हस्तांतरित केला अाहे. अायटी तज्ज्ञांच्या मदतीने अाम्ही या प्रकरणाचा सखाेल तपास करत अाहाेत. खात्यात पैसे नसताना नेमका व्यवहार कसा झाला याबाबत माहिती घेतली जात अाहे, अशी माहिती सायबर शाखेचे वरिष्ठ पाेलिस िनरीक्षक सुनील पवार यांनी दिली.  

नाशिकमध्ये सात लाखांची फसवणूक  : नाशिकमधील विल्हाेळी व अशाेका मार्ग येथील बँक अाॅफ महाराष्ट्रच्या शाखांना अशाच प्रकारे दाेन जणांनी ७ लाख १३ हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समाेर अाला अाहे. या प्रकरणी दाेघांविराेधात पाेलिसांत तक्रार देण्यात अाली अाहे. तर या प्रकरणाशी निगडित एकूण दहा बँक खाती गाेठवण्यात अाली असल्याची माहिती बँकेचे क्षेत्रीय व्यवस्थापक अार. एम. पाटील यांनी दिली.  

बँकिंग यूपीआय अॅप वापरताना ही काळजी घ्या :  
 - आपला मोबाइल अनोळखी व्यक्तीच्या हातात देऊ नका.  
 - ‌शक्यतो व्हर्च्युअल पेमेंट अॅड्रेस (व्हीपीए) तयार करून  व्यवहार करा. यामुळे तुमचा खाते क्रमांक देण्याची गरज नसते. व्हीपीए ई-मेलप्रमाणे काम करतो, त्यामुळे अधिक सुरक्षित व्यवहार करता येतात.  
 - अामिषाला बळी न पडता, आपले सिमकार्ड दुसऱ्याच्या हाती पडणार नाही याची काळजी घ्या. 
  - आपल्या खात्यातील नोंदीवर, व्यवहारांवर लक्ष ठेवा, संशयास्पद आढळल्यास संबंधित यंत्रणेच्या लक्षात आणून द्या.   
 - तुमचा बँक खाते क्रमांक, एम-पीन, ओटीपी क्रमांक अनोळखी व्यक्तींना सांगू नका.
 
उदाहरणासह समजून घ्या कशी केली बँकेची फसवणूक
यूपीअाय’ अॅपद्वारे कमाल एक लाख रुपये बँकांमधून ट्रान्सफर करण्याची सुविधा अाहे.
 
समजा, रमेश यांचे बँँकेत खाते अाहे. त्यांना सुरेशला पैसे ‘यूपीअाय’ने ट्रान्सफर करायचे अाहेत. हे पैसे पाठविल्यास सुरुवातीला बँकेच्या पूल अकाउंटमधून ते सुरेशच्या खात्यात जमा व्हायचे अाणि नंतर रमेशच्या खात्यातून बँकेच्या पूल अकाउंटला जमा व्हायचे.
 
बँकेच्या सिक्युरिटीतील ही त्रुटी हेरून भामट्यांनी रमेशला अामिष दाखवून त्याच्या फाेनमध्ये ‘यूपीअाय’ डाऊनलाेड केले.
या अॅपने रमेशच्या झीराे बॅलन्स खात्यातून सुरेशच्या खात्यावर पैसे जमा केले. अाधी पैसे पूल अकाउंटमधून सुरेशच्या खात्यावर गेले. मात्र रमेशच्या खात्यात पैसेच नसल्याने बँकेला ही रक्कम परत मिळू शकली नाही.
 
म्हणजे बँकेचे पैसे लंपास झाले अाणि त्यांच्या दृष्टीने रमेश हा अाराेपी ठरला. प्रत्यक्षात भामट्यांनी त्याचे बँक खाते, माेबाइल व पासवर्डचा गैरवापर केला.
रमेशलाही काही कमिशन देऊन ही रक्कम भामट्यांनी स्वत:च्या खात्यात वळवली. यात अाराेपी नामानिराळेच राहिले अन् रमेश व सुरेश यांची चाैकशी सुरू झाली.
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, त्रुटी दूर, आता व्यवहार सुरक्षित...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)  
बातम्या आणखी आहेत...