आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बावीस बँकांचे सर्व्हर डाऊन, व्यवहार ठप्प, एटीएम सेवेवरही परिणाम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- शहरातील 60 पैकी सुमारे 22 बँकांचे इंटरनेट सर्व्हर डाऊन झाल्यामुळे सोमवारी (5 ऑगस्ट) व्यवहार ठप्प झाले होते. सकाळपासूनच बँकांत एकच गर्दी झाली होती. तातडीची गरज म्हणून पैसे काढण्यासाठी जे ग्राहक एटीएमकडे वळले त्यांनाही निराश होऊन परतावे लागले.

इंटरनेट कनेक्शन वारंवार बंद होत असल्याने ग्राहकांना असुविधेला सामोरे जावे लागल्याचे बँक अधिकार्‍यांनी सांगितले. दुपारी 12 वाजेपर्यंत संथगतीने काम सुरू होते; परंतु त्यानंतर दोन वाजेपर्यंत सर्व्हर डाऊन झाल्याने संपूर्ण व्यवहार ठप्प झाले होते. एचडीएफसी, आयडीबीआय, एसबीआय, बँक ऑफ महाराष्ट्र या बँकांच्या ग्राहकांना याचा फटका बसला. अनेक भागांतील एटीएमवरही पैसे काढण्यासाठी गर्दी झाली होती; पण त्यासाठी प्रचंड वेळ लागत होता.

काम झाले नाही
बँकेत पैसे भरण्यासाठी सकाळी 10.30 पासून दोन तास रांगेत उभा होतो; परंतु तरीही माझे काम झाले नाही.
-मोहंमद वसीम, ग्राहक.

ग्राहकांचे सहकार्य
इंटरनेट कनेक्शनमध्ये अडथळा निर्माण झाला होता, तरीही आम्ही काम सुरू ठेवले. ग्राहकांच्या सहकार्यामुळे बरेच काम झाले.
-प्रदीप निंभोरकर, उपव्यवस्थापक, आयडीबीआय.

सुविधा सुरळीतच
एसबीआयच्या शहरातील सर्व शाखांतील व्यवहार सुरळीत होत्या. शेंद्रा शाखेत अडथळा निर्माण झाला असेल. मात्र, तेथूनही तक्रार आली नाही.
-शिवचरण फोकमारे, महाव्यवस्थापक, स्टेट बँक ऑफ इंडिया.