आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद - वेगाने वाढणारी महागाई, सार्वजनिक क्षेत्र तसेच बँकांचे सुरू असलेले खासगीकरण आणि कामगारांवरील अन्यायाविरुद्ध विविध संघटनांनी पुकारलेल्या संपात औरंगाबाद शहरातील सर्व बँकांचे दोन हजारांहून अधिक बँक कर्मचारी सहभागी झाल्याने बँकांचे कामकाज होऊ शकले नाही. परिणामी मंगळवारी शहरातील बँकांतील दीड हजार, तर जिल्ह्यातील सातशे असे एकूण 2,200 कोटींचे व्यवहार ठप्प झाल्याचा अंदाज बँक कर्मचारी संघटनेचे जगदीश भावठाणकर यांनी व्यक्त केला. एटीएम सेवा सुरळीत असल्याने औरंगाबादकरांना दिलासा मिळाला.
राष्ट्रकीयकृत बँका बंद : देशव्यापी संपाला औरंगाबाद जिल्ह्यातील पाच हजार बँक कर्मचा-यांनी सक्रिय पाठिंबा दिल्याने शहरासह जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत तसेच शेड्युल्ड सहकारी बँकाच्या शाखांमध्ये कामकाज होऊ शकले नाही. अधिकारी वर्ग बँकेत होता. मात्र, त्यांनीही या संपास बाहेरून पाठिंबा दिला होता. कोणत्याही बँकेत कर्मचारी नसल्याने बँकेत दैनंदिन क्लिअरिंग तसेच रोख जमा, वितरण बटवडा पेमेंटचे कोणतेही व्यवहार होऊ शकले नाहीत. सर्वच बँकांमध्ये शुकशुकाट दिसत होता. मात्र शहरातील खाजगी बँका सुरू होत्या.
एटीएममुळे दिलासा : एसबीआय, एसबीएच महाराष्ट्र बँक बडोदा, पंजाब नॅशनल, अॅक्सिस आयसीआयसीआय ओरिएंटल बँक यासह अन्य बँकांचे सत्तरहून अधिक एटीएम आहेत. बँक ा बंद असल्यामुळे निराला बाजार, गारखेडासह सिडको एमजीएम रुग्णालयाजवळील एटीएमवर मोठी गर्दी उसळली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.