आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँकेतील महिला कर्मचाऱ्यांवर तणावाचे कर्ज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महिलांसाठी सुरक्षित, करिअरचा उत्तम पर्याय म्हणून बँकिंग क्षेत्राकडे पाहिले जाते. पण विविध बँकांत काम करणाऱ्या महिलांची स्थिती मात्र वेगळेच काही सांगते. सार्वजनिक बँकांत काम करणाऱ्या बहुतांशी महिलांवरील तणाव वाढत असल्याचे निरीक्षण संसदेच्या महिला सक्षमीकरण समितीने एका अहवालात नोंदवले आहे.
‘सार्वजनिक बँकांत काम करणाऱ्या महिलांची स्थिती’ या विषयावरील अहवाल ऑगस्ट २०१६ मध्ये सादर केला. यात बँकांतील महिलांच्या अडचणींची माहिती दिली आहे.बँकींग क्षेत्रातील तंत्रज्ञानात झपाट्याने बदल होत असल्याने विशेषत: महिला कर्मचाऱ्यांकडून कामाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. ई-बँकिंगमध्ये गती आणि कार्यक्षमतेने काम करण्याचा आग्रह असल्याने त्यांच्यावर कामाचा दबाव वाढत चालल्याचे समितीचे म्हणणे आहे. अर्थ मंत्रालयाने उत्तर देताना वेळोवेळी प्रशिक्षण शिबिरे घेऊन बदलत्या तंत्रज्ञानाची माहिती दिली जात असून योगा, प्राणायम शिबिरेही घेतली जात असल्याचे सांगितले.
सध्या सार्वजनिक बँकांत २४ टक्के महिला आहेत. त्यातीलही अर्ध्याअधिक महिला लिपिक पदावर काम करतात. स्टेट बँक ऑफ इंडियात
अजूनही वाईट स्थिती आहे. येथे १५ ते २० टक्के महिला आहेत. ही टक्केवारी वाढवण्यासाठी नौदल, लष्कर भरतीप्रमाणे जाहिरात मोहीम राबवून महिलांना बँकिंग क्षेत्राकडे आकर्षित करावे, अशी सूचना अहवालात करण्यात आली आहे.
का वाढतोय ताण ?
{कामाचा
बोजा वाढला
{ वेळोवेळी {तंत्रज्ञानात बदल
{ उत्तमोत्तम कामगिरी बजावण्याचा आग्रह
{ सामाजिक आधाराचा अभाव
{ निर्णय प्रक्रियेत सहभागाचा अभाव
{ नेतृत्वासाठी अयोग्य शैली असल्याचे वाटणे
मुलांची परवड
कर्मचारी महिलांसोबत त्यांच्या मुलांचीही परवड होत असल्याचे अहवालात म्हटले आहे. स्टेट बँक ऑफ म्हैसूर, पतियाळा बँक, युनायटेड बँक ऑफ इंडिया या बँका वगळता इतर बँकांनी मुलांसाठी संगोपन केंद्रे, पाळणा घरे सुरू केलेली नाहीत. आवश्यक तेथे स्वयंसेवी संस्थांची मदत घेऊन सर्व बँकांमध्ये ही सुविधा द्यावी, अशी सूचना केली. दरम्यान, युनायटेड बँकेने एक पाऊल पुढे जाऊन संगोपन केंद्रांमध्ये प्रशिक्षित परिचारिकांची नियुक्ती केली आहे.
बातम्या आणखी आहेत...