आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाडा, विदर्भापेक्षा पुणे जिल्ह्यात बँकेच्या शाखा अधिक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - राज्याच्या तुलनेत मराठवाडा बँकिंग क्षेत्रात पिछाडीवर आहे. त्यामुळे विकासाची गती वाढवण्यासाठी मराठवाड्यात बँकेच्या शाखा वाढवण्याची गरज आहे. एकट्या पुणे जिल्ह्यात मराठवाडा आणि विदर्भातल्या १९ जिल्ह्यांपेक्षा बँकेच्या शाखा आणि व्यवसायही अधिक आहे. त्यामुळे विरोधी पक्षात असताना बँकिंग असमतोल दूर करण्याची मागणी करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच आता हे आव्हान आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्च २०१६ च्या आकडेवारीनुसार मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत राष्ट्रीयीकृत आणि खासगी बँकांच्या शाखांची संख्या ११७५ इतकी आहे. विदर्भात २००४, कोकणामध्ये ३९६१, पुण्यामध्ये १३३०, मुंबई, ठाणे आणि उपनगरामध्ये ही संख्या ३०१२ इतकी आहे. मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यांपेक्षा एकट्या पुणे जिल्ह्यात बँकांच्या १५५ शाखा अधिक आहेत. विदर्भापेक्षाही ८२९ शाखा मराठवाड्यात कमी आहेत. मराठवाड्यात बँकिंग क्षेत्र वाढले नसल्यामुळे विकासाच्या नोकरीच्या संधीही नाहीत. त्यामुळे पतसंस्था तसेच चिट फंड, भिशी आणि सोन्याच्या रूपात मराठवाड्यात गुंतवणूक मोठ्या प्रमाणात होते, तर अनेकदा फसवणुकीचे प्रकारही यामधूनच घडल्याचे समोर आले आहे.

मराठवाड्याचा व्यवसाय फक्त अडीच टक्के : राज्याच्याएकूण ठेवी आणि कर्जस्वरूपातला बँकिंग व्यवसाय ३४ लाख १२ हजार ९७० कोटींचा आहे. त्यामध्ये मराठवाड्याचा व्यवसाय ९१४२० कोटी असून राज्याच्या तुलनेत तो केवळ २.६७ टक्के इतका आहे. यामध्ये एकट्या औरंगाबादचा व्यवसाय ३०२९८ कोटींचा आहे.

विदर्भात लाख ६७ हजार ७५१ कोटींचा व्यवसाय असून राज्याच्या तुलनेत ४.९१ टक्के इतका आहे. पुणे जिल्ह्याचा लाख १० हजार १२८ कोटी असून राज्याच्या तुलनेत ९.०८ टक्के आहे. येथेही मराठवाडा आणि विदर्भाची एकत्रित टक्केवारी ७.५८ टक्के येत असली तरी पुण्यापेक्षा कमीच आहे. मुंबई, ठाणे उपनगरात हा व्यवसाय २५ लाख ७४ हजार ६२९ कोटी इतका असून राज्याच्या तुलनेत तो ७५.४३ टक्के आहे, तर नागपूर शहराचा व्यवसाय ९२२५६ कोटी इतका आहे.

^फडणवीसांनी मुख्यमंत्रीहोण्यापूर्वी मराठवाडा विदर्भाचा बँकिंग असमतोल दूर करण्याची मागणी तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे केली होती. मराठवाड्यात डीएमआयसी तसेच मेक इन महाराष्ट्रासह इतर प्रोजेक्ट खरेच यशस्वी करायचे असेल तर बँकिंग व्यवस्था सुदृढ करणे गरजेचे आहे. बँकेची विकासाची ही बेटे ग्रामीण भागात नेण्याची गरज आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांचीच मागणी आता पूर्ण करावी. देविदासतुळजापूरकर, बँकिंग अभ्यासक

बँकिंग तज्ज्ञ देविदास तुळजापूरकर म्हणाले की, ज्या भागात बँका सर्वाधिक त्या भागात आपोआपच कर्ज वितरण अधिक होते. त्याचा फायदा शेतकरी, सर्वसामान्य नागरिक आणि उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी होतो. मात्र मराठवाड्यात शाखाच कमी असल्यामुळे कर्ज वितरणही होत नाही. तसेच लोकांनाही बचतीसाठी बँकेचा पर्याय उपलब्ध होत नाही. मुख्यमंत्री राज्यस्तरीय कमिटीचे अध्यक्ष असल्यामुळे त्यांना असमतोल दूर करणे शक्य आहे.
बातम्या आणखी आहेत...