आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केळीची नवी प्रजाती आढळली, खान्देश, मराठवाड्यात लागवड शक्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- अंदमान बेटांवर केळीची नवी अनोखी प्रजाती आढळून आली आहे. भारतीय वनस्पती सर्वेक्षण अर्थात बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडियाचे संशोधक लालजी सिंह यांनी ही केळीची नवा प्रजाती शोधली आहे. सध्या आपण खात असलेल्या पिवळ्या केळीच्या तुलनेत अधिक गोड, केशरी गर, ३६ फुटांपर्यंत उंची, काळ्या बिया असणारी ही नवी प्रजाती या कृषी क्षेत्रासाठी वरदान ठरणार आहे.

या संदर्भात लालजी सिंह यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, केळीच्या या नव्या प्रजातीला मुसा इंडअंदमानेनसिस (Musa Indandamanensis) असे नाव देण्यात आले आहे. दोन वर्षांपूर्वी २०१३ मध्ये सर्वप्रथम ही प्रजाती मला आढळली. त्यावर बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडियाने (बीएसआय) अनेक चाचण्या घेतल्यानंतर जगात अशी दुसरी प्रजाती नसल्याचे सिद्ध
झाले आहे. आणखी दोन प्रजाती आढळून आल्या आहेत. आम्ही १३ ऑक्टोबरपासून संशोधनासाठी अंदमान बेटावर आहोत.


>पोर्ट ब्लेअरपासून दक्षिणेला १२० किलोमीटर अंतरावर लिटल अंदमान बेटांवर ही प्रजाती सापडली.
>नवी केळी सध्या आपण खात असलेल्या केळीच्या तुलनेत अधिक गोड, केशरी रंगाच्या गराची आहे.
>या केळीमध्ये काळ्या रंगाच्या बिया आहेत. या बिया मधुमेहावर गुणकारी