आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपचे बापू घडामोडे नवे शहर जिल्हाध्यक्ष

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- भारतीय जनता पार्टीच्या शहर-जिल्हाध्यक्षपदी माजी उपमहापौर बापू घडामोडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली, तर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदासाठी पंधरा इच्छुकांनी शेवटपर्यंत माघार न घेतल्याने ही निवड लांबणीवर टाकून याबाबतचा निर्णय पक्षाच्या प्रदेश अध्यक्षांकडे सोपवण्यात आला आहे.
निवड प्रक्रिया सकाळी 11 वाजता प्रारंभ झाली. शहराध्यक्ष पदासाठी विद्यमान अध्यक्ष बसवराज मंगरुळे यांच्यासह प्रदेश कार्यकारिणी सदस्य शिरीष बोराळकर, नगरसेवक संजय केणेकर, माजी उपमहापौर बापू घडामोडे व विजय साळवे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. स्पर्धेतील चौघांनी उमेदवारी मागे घेतल्याने घडमोडे यांची नियुक्ती करण्यात आली.