आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बारकोड यंत्रणा ठरली ‘पांढरा हत्ती’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - वाळू चोरीवर नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने वाळू उचलण्यासाठी देण्यात येणा-या पावत्यांवर बारकोड आणले खरे; पण बारकोड तपासणारी यंत्रणाच नसल्याने जुन्या पावत्या ब-या होत्या, असे म्हणण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.


ठेका देताना ठेकेदाराने किती ब्रास वाळू उचलावी हे स्पष्ट नमूद करण्यात येते आणि तेवढ्याच ब्रासच्या पावत्या ठेकेदाराला प्रशासनाकडून दिल्या जातात. पूर्वी या पावत्या साध्या कागदाच्या असत. त्यावर ठेकेदार किती ब्रास वाळू घेतली हे नमूद करत, पण तारीखच लिहीत नसायचे. त्यामुळे एकच पावती अनेक दिवस वापरली जाई. हा प्रकार लक्षात आल्यानंतर प्रशासनाने अत्याधुनिक अशा बारकोड असलेल्या पावत्या आणल्या. यंदापासून याच पावत्या ठेकेदारांना देण्यात येत आहेत.


बारकोडच्या पावत्या दिल्याने वाळू चोरीला आळा बसेल असा प्रश्न केला असता तपासणी केल्यावर असे उत्तर देण्यात आले. मात्र, तपासणी करण्यासाठी एकही यंत्र प्रशासनाकडे नसल्याची कबुलीही सूत्रांनी दिली. त्यामुळे बारकोडच्या पावत्या असून काहीही उपयोग होत नसल्याचे यावरून स्पष्ट झाले. पुणेस्थित एस. एस. के. इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने या बोरकोडच्या पावत्या तयार करून दिल्या आहेत. त्यांच्यासोबत करार करतानाच तपासणीची जबाबदारीही निश्चित करण्याची गरज होती. परंतु तसे झाले नाही. त्यामुळे आतापर्यंत एकही बारकोडच्या पावत्यांचा वापर कसा होतो याची तपासणी झाली नाही. तेव्हा यंत्र घेण्यात आले नसले तरी एक यंत्र लवकरच खरेदी करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात येत असल्याचे अपर जिल्हाधिकारी किसनराव लवांडे यांनी सांगितले.


अशी होते तपासणी
उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, स्थानिक तलाठी शक्य तेव्हा पावत्या तपासतात. एकच पावती पुन्हा वापरली जात नाही याची खात्री केली जाते. त्याचबरोबर मंजूर केलेल्या ब्रासपेक्षा जास्त वाळू उचलली जात नसल्याची खात्री केली जाते. पावत्यांवर बारकोड असले तरी यंत्रणा नसल्यामुळे फक्त पावती तेवढी बघितली जाते. बारकोड नेमका काय सांगतो हे कोणालाही कळत नाही.