आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठवडाभरात 4 हजार आरोग्यदायी तुळस रोपांचे वितरण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डीबी स्टार आणि गायत्री चेतना केंद्र यांच्या वतीने आयोजित संजीवनी भेट अभियानाला शहरवासीयांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. सामान्य वाचक, डॉक्टर, कलावंत, खेळाडू, उद्योजक, अधिकारी आणि राजकारणी अशा सर्व क्षेत्रांतील मान्यवरांनी व सर्व समजातील लोकांनी अभियानात सहभागी होऊन विविध संकल्प केले. अभियानांतर्गत 4 हजार तुळस रोपांचे वितरण करण्यात आले.
सोमवार, 25 नोव्हेंबरपासून या अभियानाला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी सकाळी 11 वाजेपासूनच वाचकांनी दैनिक ‘दिव्य मराठी’ कार्यालयासह शहरातील चारही केंद्रांवर गर्दी केली. एकाच दिवसात 2200 रोपांचे वितरण झाले. त्यानंतर आठवडाभर विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी ‘दिव्य मराठी’ कार्यालयात येऊन तुळस रोपांचा स्वीकार केला. वाचक व सर्व मान्यवरांनी या वेळी आपल्या प्रत्येक कार्यक्रमात बुके देण्याऐवजी तुळस रोप भेट देण्याचा संकल्प केला.
ठळक मुद्दे
या अभियानात व्यक्त झालेले संकल्प
> क्रीडा संघटनांनी पाहुण्यांचे स्वागत रोप देऊन करण्याचा निर्णय घेतला.
> क्रेडाई संघटनेने प्रत्येक ग्राहकाला तुळशी वृंदावन भेट देण्याचा निश्चय केला.
> मसिआनेही कार्यक्रमात रोप वाटून पाहुण्यांचे स्वागत करण्याचा संकल्प केला.
बातम्यांवर चर्चा
अभियानात आलेल्या सर्वच लोकांनी या वेळी डीबी स्टारमधील विविधांगी बातम्यांवर चर्चा केली. स्वच्छता अभियान, वाळवी, वृक्षारोपण, अवैध मद्यविक्रीवर प्रसिद्ध करण्यात आलेली ‘बेबंदशाही’ ही वृत्तमालिका तसेच भ्रष्टाचारासह व्यवस्थेवर प्रहार करणार्‍या बातम्यांवरच प्रत्येक जण बोलत होता. असे सामाजिक उपक्रम डीबी स्टारने सातत्याने राबवावेत, अशी अपेक्षाही वाचक या नात्याने या सर्वसामान्य वाचक व विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी या वेळी व्यक्त केली.