आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद-सिल्लोड मार्गावर दर वीस मिनिटांनी बससेवा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फुलंब्री -औरंगाबाद-सिल्लोड मार्गावर वाढणारी वाहतूक पाहता राज्य परिवहन मंडळाने दर 20 मिनिटांनी एस.टी. सुरू केली आहे. या निर्णयाचे प्रवासी वर्गातून स्वागत होत आहे.
औरंगाबाद-सिल्लोड मार्गावर मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक होते. मात्र, महामंडळाच्या बस अपुर्‍या पडत होत्या. त्यामुळे नाइलाजास्तव प्रवासी काळी- पिवळीने प्रवास करत होते. त्यात लांब पल्ल्याच्या गाड्या थांबत नसल्याने व वाहकाची प्रवाशांसोबतच उद्धट वागणूक यामुळे प्रवासीदेखील वैतागले होते. परिणामी बसला अधिकचे प्रवासी मिळत नव्हते. या मार्गावर औरंगाबाद ते सिल्लोड, सोयगाव, फुलंब्री, खुलताबाद, कन्नड तालुक्यातील भागात नोकरीसाठी जाणार्‍या कर्मचार्‍यांची संख्या मोठी आहे. मात्र, वेळेवर बस नसल्याने हे कर्मचारी काळी-पिवळीने प्रवास करत होते. त्यात अधिकचे प्रवासी भरत असल्याने काळी-पिवळीचा प्रवास धोकादायक बनला होता. त्यामुळे विभागीय नियंत्रक संजय सुपेकर यांच्या पुढाकाराने सिल्लोड मार्गावर बसफेर्‍या वाढविण्यात आल्या आहेत.