आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वटवाघळांच्या झाडाची सलीम अली उद्यानात सळसळ!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - पुराणामध्ये वटवाघूळ हा सैतानी प्राणी आहे, अशी धारणा आहे. अनेक जण त्याला अशुभ मानतात. झपाट्याने वाढणारे शहरीकरण, वाढत्या वृक्षतोडीमुळे ते नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. असे असले तरी डॉ. सलीम अली उद्यानातील वडाच्या झाडावर सुमारे 400 वटवाघळांचे वास्तव्य मागील तीस ते चाळीस वर्षांपासून आहे.

शरीराच्या विशिष्ट रचनेमुळे विशेषत: तोंडाच्या आकारामुळे त्यास ‘इंडियन फ्लाइंग फॉक्स’ म्हटले जाते. दिवसभर ते झाडाला लटकलेले असतात. भक्ष्य शोधण्यासाठी वटवाघूळ रात्री बाहेर पडते. एका झाडावरून दुसर्‍या झाडाकडे जाताना ते अनेक प्रकारची फळे खातात. याद्वारे परागीकरण होऊन बीजारोपणास मदत होते. वटवाघळांना रात्रीच्या वेळी अधिक स्पष्ट दिसते. म्हणून अन्न शोधण्यासाठी ते रात्रीच निघतात. पिकांवरील किडे, अळ्या खाऊन एक प्रकारे ते पीक संरक्षणास शेतकर्‍यांची मदत करतात.

फ्रूट बॅट : वटवाघूळ हा पक्षी नसून सस्तन प्राणी आहे. वर्षातून एकाच पिलाला जन्म देतात. पंखाला लागूनच पाय असतात. पायाला हाड नसल्यामुळे झाडावर बसतात आणि चालता येत नाही म्हणूनच उलटे लटकलेले असतात. हा प्राणी प्रतिकूल परिस्थितीत जगू शकतो. किडे, फळे खातो म्हणून त्यास ‘फ्रूट बॅट’सुद्धा म्हणतात.

यास रामफळ, आंबे, चिकू जास्त आवडतात. लांबी 20 ते 25 सें.मी. असते आणि वजन 2 ते 3 किलोपर्यंत असते. वटवाघूळ 15 ते 30 वष्रे जगते. जन्मत: पिलांचे डोळे उघडेच असतात. आठ महिन्यांपर्यंत पिलांचा सांभाळ मादी करते. वटवाघळे उत्तम प्रकारे पोहू श्कातात. ते पाण्यातील किडे, मासे खातात. वन्यजीव अभ्यासक वटवाघळास मानवी जीवनात उपयुक्त मानतात.