आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीसीएएसकडून विमानतळाची सूक्ष्म पाहणी होणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - चिकलठाणा विमानतळावरून देश-विदेशात कार्गेा विमानसेवा सुरू करण्याची पूर्ण तयारी झाली आहे. सोमवारी बीसीएएस सेक्युरिटी विभागाचे सहायक आयुक्त बी. पी. शर्मा, सीआयएसएफचे अधिकारी कॅप्टन एस. के. मलिक यांनी विमानतळाच्या पाहणीला सुरुवात केली असून दोन दिवस ही समिती संपूर्ण विमानतळाची सूक्ष्म पाहणी करणार आहे. विमानतळातून वाहणारे नाले, भटकी कुत्री, सुरक्षा भिंतीजवळील उंच इमारती नागरिकांचा वावर, कंपन्यांतून निघणारा धूर विमानसेवेसाठी अडचणीचा ठरत आहे. याबाबत वैमानिकांनी तक्रारी केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ही समिती सूक्ष्म पाहणी करीत अाहे.