आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादमध्ये बि‍‍बट्या जेरबंद ; वनविभागाच्‍या अभियानाला यश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- औरंगाबादकरांमध्‍ये दहशत निर्माण करणा-या ब‍िबट्याला पकडण्‍यात आले आहे. वन विभागाने ही कामगिरी केली आहे. तब्‍बल 19 तासाच्‍या अथक प्रयत्‍नानंतर अखेर बिबट'याला पकडण्‍यात आले आहे'

तत्‍पूर्वी, वन विभागाने कार्यालयातील माकडाच्या तुटलेल्या पिंजर्‍यात बिबट्याला ठेवल्याने त्याने पंजाने गज उचकटून नजीकच्या झाडीत धूम ठोकली होती. त्याला पकडण्यासाठी वन विभागाच्या कर्मचार्‍यांनी मटणाचे आमिष दाखवले. वनाधिकार्‍यांच्या मदतीला पोलिस ताफा आणि स्टायकिंग फोर्स धावले असून ते जंग जंग पछाडत होते. परंतु बिबट्या काही हाती लागण्याची चिन्हे दिसत नव्‍हती. फ्लड लाइट्स आणि टॉर्चच्या मदतीने त्याला पकडण्यासाठी पथकांचे ‘जागते रहो’ अभियान रात्रभर सुरू होते .