आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिअर कंपन्यांच्या पाण्याचा अहवाल मागवला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहरातील११ मद्यनिर्मिती कारखान्यांना दररोज युनिटनिहाय लागणाऱ्या पाण्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी मागवला आहे. सात दिवसांत यासंदर्भात आढावा घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी निधी पांडे यांनी दिली. तसेच फार्मा कंपन्यांना आवश्यक तेवढाच पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी सांिगतले की, पिण्याच्या पाण्याला सर्वोत्तम प्राधान्य आहे. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. जायकवाडीच्या मृतसाठ्यात मोठ्या प्रमाणात घट होत असल्यामुळे ही कपात करण्यात आली आहे. उद्योगाच्या पाणी कपातीचा आढावा पंधरा दिवसांनी घेण्यात येणार आहे. त्यानंतर त्याचे परिणाम काय होतात हे पाहून पुढील निर्णय घेण्यात येईल. सध्या एमआयडीसीच्या पाण्याची १४ टक्के गळती होते. ही गळती रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना एमआयडीसीला देण्यात आल्या आहेत.
उद्योगांनावॉटर ऑडिटच्या सूचना: उद्योगांनीसीएसआरच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे करण्याच्या सूचना एमआयडीसीला देण्यात आल्या आहेत. बिअर कारखाने एमआयडीसी आणि बाहेरून किती पाणी घेतात याचीही माहिती मागवण्यात आली आहे. उद्योगांना वाॅटर ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. बिअर कारखान्यांनी एक लिटरसाठी साडेतीन लिटर पाणी वापरले जाते, असे सांगितले. मात्र, प्रत्येक कंपनीने अशाच पद्धतीने यंत्रणा वापरली आहे का? प्रत्येकाचे मानक काय आहे, किती कंपन्या पाण्याचा पुनर्वापर तसेच आधुनिक तंत्रज्ञान वापरतात, याविषयीदेखील माहिती मागवली आहे.

राजकीय दबावाबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे मौन
पाणी कपातीची बैठक नियोजनात नसताना ऐनवेळी बोलावण्यात आली होती. औरंगाबादमध्ये उद्धव ठाकरे यांनी बिअरचा पाणीपुरवठा बंद करण्याची मागणी केल्यानंतर तातडीने ही बैठक बोलावण्यात आली होती. याविषयी राजकीय दबाव आहे का, असे विचारले असता जिल्हाधिकाऱ्यांनी मौन बाळगत उत्तर देणे टाळले.

तेव्हाच्या परिस्थितीनुसार घेतला निर्णय
अपूर्व चंद्रा यांनी पाणी कपात केल्यास डीएमआयसीत येणाऱ्या उद्योगाबाबत चुकीचा संदेश दिला जाईल, असे सांगितले होते. याबाबत विचारले असता त्या वेळेची परिस्थिती आणि आजची परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे परिस्थितीनुसार हा निर्णय घेतल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...