आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वकील कक्षात दोन वकिलांत साखळी, दगडाने हाणामारी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जिल्हा न्यायालयातील वकील कक्षात दोन वकिलांमध्ये साखळी आणि दगडाने हाणामारी झाली. शुक्रवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. अर्धा तास सुरू असलेल्या या गोंधळामुळे न्यायालयात काही काळ तणाव निर्माण झाला होता. या हाणामारीत दोन्ही वकील आणि एका वकिलाची पत्नी जखमी झाली आहे. संध्याकाळी दोन्ही वकिलांनी वेदांतनगर पोलिस चौकीत एकमेकांविरोधात तक्रार दाखल केली. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी १२.३० वाजता अॅड. मनोहर लोखंडे आणि त्यांची पत्नी कविता लोखंडे (३०) या जिल्हा न्यायालयातील वकिलांच्या कक्ष क्रमांक एकमध्ये बसून काम करत होते. त्यांच्या शेजारच्या टेबलवर अॅड. रघुनंदन जाधव हे काम करतात. लोखंडे यांनी तक्रारीत म्हटल्यानुसार, त्यांचा जाधव यांच्यासोबत खुर्ची ओढून बसण्यावरून वाद झाला. वाद टोकाला गेल्यानंतर जाधव यांनी अॅड. मनोहर लोखंडे त्यांची पत्नी कविता यांना खुर्चीला असलेल्या साखळीने मारहाण केली. यात दोघेही रक्तबंबाळ झाले. त्यानंतर लोखंडे यांनी जाधव यांच्याविरोधात वेदांतनगर पोलिस चौकीमध्ये तक्रार दिली. जाधव यांनीसुद्धा लाेखंडे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रवीण पाटील करत आहेत. 

पहिल्यापत्नीचा जामीन घेतल्याने काढला राग : अॅड.रघुनंदन जाधव यांनी लोखंडे यांच्याविरोधात तक्रार दिली. या तक्रारीनुसार, कविता ही लोखंडे यांची दुसरी पत्नी आहे. लोखंडे यांचा पहिल्या पत्नीसोबत वाद सुरू होता. त्यावरून त्यांनी पहिल्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला हाेता. त्या प्रकरणात अॅड. जाधव यांनी लोखंडे यांच्या पत्नीची केस लढवून जामीन मिळवून दिला होता. त्याचा राग मनात धरून लोखंडे यांनी वाद घातला आणि मारहाण केली. दोघांच्या परस्परविरोधी तक्रारी दाखल करून घेण्यात आल्या आहेत. तपासाअंती सर्व प्रकरण स्पष्ट होईल, असे तपास अधिकारी उपनिरीक्षक प्रवीण पाटील यांनी सांगितले. 
 
 
बातम्या आणखी आहेत...