आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिर्झा राजांच्या वारसास्थळाला सौंदर्यीकरणाचे वेध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मुघलांचेमांडलिक सरकार राजपुतान्यातील एका रियासतीचे मिर्झा राजे जयसिंग यांची औरंगाबादेतील वानखेडेनगरातील जयसिंग छत्री हे स्मारक दुर्लक्षामुळे जनमानसाच्या विस्मृतीत चालले आहे. जयसिंग छत्री या स्थळाचे सौंदर्यीकरण करून ते स्थानीय पर्यटन स्थळ व्हावे, अशी मागणी आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त नागरिकांमधून होत आहे.

मिर्झा राजे जयसिंग हे औरंगजेबाबरोबर दक्षिणेत म्हणजेच औरंगाबादेत छत्रपती शिवाजींचे पारिपत्य करण्यासाठी आले होते. त्यांचा मुक्काम मकबरा परिसरातील आजच्या जयसिंगपुरा भागात होता. तिथे राजा जयसिंगांचा वाडा होता. या वाड्याबरोबरच त्यांची आठवण म्हणून जयसिंगांची छत्री नंतर बांधली गेली.

पाच - सात वर्षांपूर्वी ही छत्री त्याचा घुमट दुरवस्थेत होता. त्यावर गवत उगवले होते. छत्रीचा गिलावा पडला होता. परिसरातील रहिवाशांनी छत्री स्मारकाचा कायापालट केला आहे. साडेतीनशे वर्षांपूर्वी बांधलेले हे स्मारक आज महापालिकेच्या स्थानीय १५६ ऐतिहासिक स्मारकांच्या यादीत येते. मात्र त्याकडे आजवर महापालिकेची लोकल हेरिटेज कमिटी महापालिकेने अक्षम्य दुर्लक्ष केलेले आहे. पूर्वी गुंठेवारीत असलेला हा परिसर महापालिकेत समाविष्ट झालेला आहे. त्यामुळे या स्मारकाच्या चहुबाजूंनी बंगले, अपार्टमेंट होत आहेत. परिणामी ही वास्तू झाकोळली जात आहे.

कधी काळी दोन किलोमीटर दुरून दिसणारे स्मारक शहरवासीयांच्या विस्मृतीत जात आहे. हे ऐतिहासिक स्थळ अबाधित ठेवायचे असेल तर त्याभोवती छोटीशी बाग फुलवून सौंदर्यीकरण करण्याची गरज आहे.

मुघल-राजपूत शैलीतील बांधकाम
साधारणत:साडेतीनशे वर्षांपूर्वी बांधलेली ही छत्री राजपूत -मुघल स्थापत्य शैलीतील आहे. २४ खांबांवर उभी राहिलेली नऊ खंडांतील दुमजली इमारत आहे. वरील भाग हवाखोरीसाठी दूरवर टेहळणीसाठी बनवला आहे. १८ कोरीव कमानींचे सौंदर्य, नजाकत भव्यता असलेली ही छत्री काळा पाषाणातील असून याचे बांधकाम काहीसे सोनेरी महालाशी साधर्म्य आहे. -डॉ. महेशसरोदे, पुरातत्त्वज्ञ

आम्हीस्वखर्चाने देखभाल करतो
राजेजयसिंगांनी बांधलेल्या या वास्तूची दुरवस्था पाहता आम्ही गेली दहा वर्षांपासून स्वखर्चाने देखभाल दुरुस्ती करतो. पडीक वास्तूत कोणीच लक्ष देत नसल्याने आम्ही पुढाकार घेतला. मात्र त्याचे सौंदर्यीकरण होणे गरजेचे आहे. -राजगौरव वानखेडे,नगरसेवक

ठोस माहिती उपलब्ध नाही
याइमारतीचा कुठलाही ऐतिहासिक पुरावा मिळत नाही. ही वास्तू मिर्झा राजे जयसिंग यांनी त्यांच्या हयातीत बांधली, असाही एक प्रवाद आहे. राजे दिल्लीला जाताना वा दिल्लीहून येतांना या छत्रीवर थांबत असत. तसेच हवापालट म्हणून गुप्त मसलती करायला येथे येत असत. मात्र दुसऱ्या एका प्रवादानुसार ही इमारत मिर्झा राजे जयसिंगांचे निधन झाल्यावर त्यांची स्मृती म्हणून बांधली गेली.