आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Because Of Vinayakrao I Have Become Big Personality Sharad Pawar, DIvya Marathi

विनायकरावांमुळेच मी घडलो, वैजापुरात शरद पवारांनी दिला आठवणींना उजाळा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर - तत्कालीन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व वैजापूर तालुक्याचे भूमिपुत्र विनायकराव पाटील यांच्यामुळेच मी आजपर्यंत यशस्वी वाटचाल करत असल्याची कबुली माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. वैजापुरात गुरुवारी आयोजित राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. ते म्हणाले, वैजापूर तालुक्याला मी नेहमीच झुकते माप दिले आहे, मतदारांनी यंदा भाऊसाहेब पाटलांनाच मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन पवार यांनी केले. या वेळी जिल्हाध्यक्ष सुधाकर सोनवणे, माजी आमदार कैलास पाटील चिकटगावकर, उमेदवार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, विश्वास पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

विरोधक-सत्ताधा-यांचे साटेलोटे : राज ठाकरे
विरोधक व सत्ताधा-यांचे साटेलोटे असून दोघांनी राज्याचे वाटोळे केल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. राज्यातील शिक्षण पद्धतीवर टीका त्यांनी टीका केली. रोजगार व शिक्षणात विसंगती असून राज्यात मनसेची सत्ता आल्यास शासकीय सुरक्षा एजन्सी सुरू करून तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार असल्याचा दावाही राज ठाकरे यांनी केला. ते सिल्लोड येथे मनसे उमेदवार दीपाली काळे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत गुरुवारी बोलत होते. या वेळी त्यांनी आघाडी व युतीतील चारही पक्षांवर टीका केली. राज्य चालवण्यास ते लायक नसून राजकारणाचा तमाशा केला आहे. जर पुन्हा हे पक्ष सत्तेत आले तर राज्य पंधरा वर्षे मागे जाईल, असा आरोपही त्यांनी केला.