आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बीड बायपासवरील शेकडो अतिक्रमणांवर पडला हातोडा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- बीडबायपास रोडवरील जाहिरात, दिशादर्शक फलक, रस्त्याच्या हद्दीतील संरक्षक भिंती, पक्कीे बांधकामे यामुळे रस्त्याचा श्वास कोंडला होता. गेल्या दहा वर्षांत हा मार्ग अधिक धोकादायक बनला होता. याबाबतचे सविस्तर वृत्त शनिवारी "दिव्य मराठी'ने प्रसिद्ध केले. या वृत्ताची दखल घेऊन जागतिक बँक प्रकल्प विभागामार्फत बुधवारी (२७ मे) या मार्गावरील अतिक्रमणे हटवण्यात आली.
अतिक्रमण हटाव कारवाईत व्यावसायिक, व्यापारी, वैद्यकीय, शैक्षणिक आणि इतर सरकारी कार्यालयांनी रस्त्यावर उभारलेली छोटी मोठी जाहिरात फलके काढण्यात आली. त्याचबरोबर काही प्रतिष्ठानांनी केलेली पक्की बांधकामे भुईसपाट करण्यात आली.
अपघातांमुळे मृत्यूचा सापळा
बीडरोडवर सतत अपघात घडत आहेत. या रस्त्यावर महिन्यांत दहाजणांचे बळी गेले आहेत. अपघाताच्या मालिकांमुळे बीडबायपास मृत्यूचा सापळा बनला आहे. या पार्श्वभूमीवर "दिव्य मराठी'ने ‘अतिक्रमण, काळोख अन् गायब झालेले कठडे'या मथळ्याखाली मार्गावरील अपघातांची कारणमीमांसा करणारे वृत्त प्रसिद्ध केले. या वृत्ताची दखल घेऊन जागतिक बँक प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता व्ही.एल.दुबे यांनी अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली. दुबे यांच्यासह उपअभियंता अनिल बेंद्रे, शाखा अभियंता सुनील कोळसे, सहायक अभियंता रूपाली महाजन, कनिष्ठ अभियंता प्रतिभा पाटील तसेच सद्भाव प्रकाश जॉइंट व्हेंचरचे मुख्य व्यवस्थापक सुरेंद्रसिंग परमार, जवाहर कॉलनी, सातारा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सलीम शेख, कैलास प्रजापती यांच्यासह ८० पोलिस कर्मचारी मोहिमेत सहभागी होते.
अतिक्रमणांवर हातोडा
कारवाईत अधिकाऱ्यांनी कुणाच्याही दबाबाला बळी पडता छोट्यांसह बड्यांची अतिक्रमणे हटवली. कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शब्बीर पटेल यांच्या पटेल तसेच मिलन लॉन्सची सुरक्षाभिंत आणि प्रवेशद्वार,माजी नगरसेवक खाजा नईमउद्दीन यांचे तसेच भाजपनेते विनायकराव हिवाळे पाटील यांचे नाल्यावरील पक्के बांधकाम पाडले. कमलनयन बजाज रुग्णालयाची सुरक्षाभिंत आणि बाहेरील सौंदर्यबेटही भुईसपाट करण्यात आले.

- सिल्क मिल्क कॉलनीसह जागोजागी फोडण्यात आलेले दुभाजकही बंद करावेत. माँ-बाप दर्गा ते पैठण जंक्शन हद्दीत रुंदीकरण ताबडतोब करणे गरजेचे आहे.
खाजा नईम उद्दीन, माजी नगरसेवक
- यापुढे आम्ही अतिक्रमण करणार नाही. पण सर्वांवरच कारवाई व्हावी, भेदभाव नको.
सुपडाबाई भिवसने
- सा. बां.ने तत्काळ डांबरीकरण अपघात कमी होईल. स्पीड ब्रेकर आवश्यक आहे.
जावेद शब्बीर पटेल
एक इंचही अतिक्रमण दिसणार नाही
- आम्हीसमान न्यायाचे समीकरण ठेवले आहे. त्यामुळे आता या मार्गावर कुणाचेही अतिक्रमण ठेवणार नाहीत.जो कोणी अतिक्रमण करेल त्याला विरोध केला जाईल.
अनिल बेंद्रे, उपअभियंता, जागतिक बँक प्रकल्प सा.बां.विभाग
बातम्या आणखी आहेत...