आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड बायपास : तिहेरी अपघातात दोघे गंभीर जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - दुचाकी स्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात दोन ट्रकची टक्कर होऊन एका ट्रकचा चालक गंभीर जखमी झाला. दुचाकीला धडक बसल्याने दुचाकीस्वारही गंभीर जखमी झाला. हा अपघात गुरुवारी रात्री ११ वा. बीड बायपास रोडवर घडला.

दूध विक्रेता असलेले भानुदास साबळे (रा. सातारा) संग्रामनगर उड्डाणपुलाकडून पटेल लॉन्सकडे दुचाकीवर (एमएच २० डीवाय १७७५) जात होते. त्याचवेळी देवळाई चौकाकडून महानुभाव अाश्रमाकडे एक ट्रक तसेच विरुद्ध दिशेने दुसरा ट्रक येत असताना साबळेंची दुचाकी दोन्ही ट्रकच्या मध्ये शिरली. त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात दोन्ही ट्रकची समोरासमोर टक्कर झाली. शिवाय साबळे यांच्या दुचाकीला एका ट्रकची धडक बसली. या विचित्र अपघात साबळे गंभीर जखमी झाले तर एका ट्रकचा चालकही गंभीर जखमी झाला. दोघांनाही घाटी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

वाहतूक रखडली : या अपघातानंतर बीड बायपासवरील वाहतूक रात्री उशिरापर्यंत खोळंबली होती. सातारा पोलिस ठाण्याचे कर्मचारी उशिरापर्यंत घटनास्थळी वाहतुकीचे नियमन करत होते. बीड बायपासवरील वाहतूक शहरमार्गे वळवण्यात आली होती.
बातम्या आणखी आहेत...