आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Beed District Citizens Sunil Kendrekara Still Ricebala

बीड जिल्ह्यातील नागरिकांसाठी सुनील केंद्रेकर आजही रिचेबल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद-चौसाळा तालुक्यातील एक व्यक्ती सिडको मुख्य प्रशासकांच्या कॅबिनमध्ये सरळ शिरते. ज्वारीची दहा बारा कणसं भरलेल्या वायरच्या पिशवीकडे साहेबांची नजर जाते. माझ्यासाठी कणसं आणलीत वाटतं, असे आस्थेने साहेब विचारतात. तत्काळ कॉल बेल वाजते. आत धावलेल्या शिपायास साहेब सांगतात. यांना माझ्या गाडीतून घरी घेऊन जा. त्याने माझ्यासाठी ज्वारीची कणसं आणलीत. शिपाई त्या व्यक्तीस गाडीत बसवतो व साहेबांच्या घरी घेऊन जातो. आपल्याशी भावनिक नातेसंबंध जडलेल्या व्यक्तींना सांभाळण्याची कला बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी व सिडकोचे विद्यमान मुख्य प्रशासक सुनील केंद्रेकर यांच्याकडून शिकावी. बीडमधून बदली झाल्यानंतरही केंद्रेकर मनाने आजही बीडच्या सामान्यांसोबत असल्याचे त्यांच्या कृतीतून जाणवते.

बीड आणि केंद्रेकर हे नाते घट्ट झाल्याची प्रचिती क्षणोक्षणी येते. सनदी अधिकारी बदलून गेल्यानंतर तो मागचे सगळे विसरून जातो. मात्र, बीडच्या जिल्हाधिकारी पदावरून बदली झाल्यानंतर केंद्रेकरांसाठी अनेक नागरिक रडल्याची आठवण चौसाळ्याचे सामाजिक कार्यकर्ते प्रसाद देशमुख सांगितली. केंद्रेकरांच्या चांगुलपणापोटीच 200 कि. मी. बसचा प्रवास करून औरंगाबादच्या सिडको कार्यालयात आलो. अजूनही केंद्रेकर बीडमध्ये परततील, यासाठी सामान्यांच्या आशाळभूत नजरा त्यांच्याकडे आहेत.

कामांबाबतही होते विचारणा

सिडकोचे मुख्य प्रशासक असतानाही केंद्रेकरांना बीडमधून कामासंबंधीचे दररोज किमान 40 एसएमएस येतात. केंद्रेकरही कामाचे स्वरूप, कुठल्या स्तरावर काम आहे, याची विचारपूस करून संबंधित अधिकार्‍याकडे मोबाईलद्वारे पाठपुरावा करतात.

आपुलकीचा धागा

औरंगाबादेत येणार्‍या बीड जिल्ह्यातील नागरिकांनी केंद्रेकरांना भेटण्याची ओढ असते. दहा ठिकाणी चौकशी करत ते सिडकोच्या कार्यालयात येतात. काम नसले तरी अनेक जण त्यांची भेट घेतात. केंद्रेकरही त्यांना वेळ देतात.