आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंबाजोगाईत २७, २८ ऑगस्ट रोजी जलतज्ज्ञांची परिषद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - गांधी रिसर्च फाउंडेशन, मानवलोक, अफार्म व जैन इरिगेशन सिस्टिम्स प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने अंबाजोगाई (जि.बीड) येथे २७ व २८ ऑगस्ट रोजी "ग्रामविकासासाठी सक्षम जलनीती’ या विषयावर दोनदिवसीय राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. मानवलोक संस्थेच्या परिसरात होणाऱ्या या परिषदेचे उद्घाटन ज्येष्ठ जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांच्या हस्ते होणार आहे. ग्रामीण भागात कार्यरत असणाऱ्या विवधि सेवाभावी संस्था, प्रतनिधिी यात सहभागी होणार आहेत.

पाणी आणि ग्रामविकास या क्षेत्रात काम करणाऱ्या जलतज्ज्ञांना एकत्रित आणून त्यांचे अनुभव व भविष्यातील नियोजन, यावर व्यापक विचारमंथन होणार आहे. २७ ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊ वाजता जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार पाशा पटेल उपस्थित राहणार आहेत. या वेळी डॉ. द्वारकादास लोहिया यांचे बीजभाषण होणार आहे. त्यानंतर "पाण्याची उपलब्धता, नदीचे पुनरुज्जीवन' हा परिसंवाद होणार असून त्यात मुकुंद धाराशिवकर, अभिजित घोरपडे, सुनील जोशी, विजय दिवाण, डॉ. गजानन डांगे हे सहभागी होणार आहेत. ितसऱ्या सत्रात सुरेश खानापूरकर, दि. मा. मोरे, आदींच्या उपस्थितीत "पाणी बचत कशी व कोठे?' हा परिसंवाद होईल. चौथ्या टप्प्यात "जलस्रोत व्यवस्थापन व पाण्यासंबंधीचे कायदे'या विषयावर सत्र होणार असून त्यात प्रदीप पुरंदरे, अॅड. प्रदीप देशमुख सहभागी होतील.

२८ ऑगस्ट रोजी "जलसंधारणाची नवी परिभाषा' या विषयावर चर्चा होणार असून त्यात विजयअण्णा बोराडे, सुभाष तांबोळी, अनिकेत लोहिया आदी मान्यवर सहभागी होणार आहेत. त्यानंतर "अन्न व जलसुरक्षितता'या विषयावर सत्र होणार असून त्यात पत्रकार अतुल देऊळगावकर, डॉ. सुधीर भोंगळे सहभागी होणार आहेत. यानंतर ‘गटशेती व उच्च तंत्रज्ञान’ या विषयावर चर्चासत्र होणार आहे. परिषदेच्या समारोप सत्रात "ग्रामविकासासाठी लोकसहभागाची सूत्रे'या विषयावर चर्चा होणार आहे. त्यात माजी आयुक्त
भास्कर मुंडे, निशिकांत भालेराव, डॉ. उदय निरगुडकर, डॉ. द्वारकादास लोहिया, शांताराम पंदेरे आदी सहभागी होणार आहेत.