आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंकजा यांच्‍या फोटोची अशीही महती, हरवलेला चिमुकला सुखरूप पोहोचला घरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- दुष्‍काळी दौ-यातील पंकजा मुंडे यांचा सेल्‍फी काही दिवसांपूर्वी प्रचंड वादात सापडला होता. मात्र, पंकजा यांच्‍या फोटोमुळेच एका कुटुंबाला त्‍याचा हरवलेला चिमुरडा परत मिळाला आहे. कुणीही म्‍हणेल हे कसे काय शक्‍य. पण पंकजामुंडे यांच्या फोटोची महती सांगणारी
पोस्ट सध्‍या फेसबुकवर फिरत आहे. यामध्‍ये उल्‍लेख केला आहे की, पंकजांचा फोटो ओळखून या चिमुकल्‍याने पोलिसांना सांगितले की, मी यांच्‍या गावाचा आहे आणि पोलिसांनी त्‍याच्‍या घराचा शोध घेतला. काय आहे प्रकरण..
- परळीतील भीमनगरमधील बांधकाम मजूर केशव वैजनाथ आदोडे पत्नी अर्चनासोबत देव दर्शनासाठी चंद्रपूरला गेले होते.
- केशव व अर्चना यांच्‍यासोबत त्‍यांचा सहा वर्षाचा मुलगा सुशीलही होता.
- परत येताना 30 एप्रिल रोजी नांदेड येथे बहिणीकडील पाहूणचार आटोपून ते परळीला येत होते.
- नांदेड रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या गर्दीत सुशील आईचा हात सोडून स्थानकाबाहेर कधी गेला कळाले नाही.
- सुशील बेपत्ता झाल्याचे लक्षात आल्‍यानंतर आई-वडिलांनी रेल्‍वे पोलिसांना माहिती दिली.
- जाणाऱ्या-येणाऱ्या सर्व रेल्वे तपासल्या, पण कुठेही त्याचा शोध लागला नाही.
सुशील गेला कुठे..
- हरवलेला सुशील स्थानकाबाहेर आला खरा...पण काहीच कळत नसल्याने तो नरसी नायगावकडे जाणाऱ्या प्रवाशी जीपमध्ये बसला.
- नरसी नायगाव येथे सर्व प्रवासी उतरले पण हा एकटाच राहिल्याने चालकाने त्याची चौकशी केली.
- चालकासोबत त्‍याला काहीच बोलता न आल्याने चालकही हतबल झाला.
- चालकाने या चिमुकल्‍याची माहिती पोलिसांना दिली.
( संदर्भ - Pankaja Gopinath Munde या नावाचे फेसबुक पेज )
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून वाचा असे काय झाले, सुखरूप घरी पोहोचलेला सुशील..
बातम्या आणखी आहेत...