औरंगाबाद - लाच प्रकरणात अडकलेले बीडचे पोलिस निरीक्षक चांगदेव तांबडे यांच्या औरंगाबाद येथील घराची झाडाझडती घेण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अहवाल बीडच्या पोलिस अधीक्षकांना पाठवला आहे.
बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केलेल्या कारवाईनंतर औरंगाबादेतील नागेश्वरवाडी येथील त्यांच्या घराची झाडाझडती घेण्यात आली. यामध्ये काही आक्षेपार्ह कागदपत्रांसह रोकड मिळून आली आहे. बीडच्या घरात 40 राउंड सापडले आहेत.
पुणे रोडवरील जिकठाण फाट्यालगत दोन
एकर शेतीच्या कागदपत्रांचा समावेश आहे. काही गोपनीय कागदपत्रे हस्तगत केली असून ती जाहीर करता येणार नाहीत, असे पोलिस उपअधीक्षक प्रकाश कुलकर्णी यांनी सांगितले. तांबडे यांचा बहुतांश कार्यकाळ औरंगाबादमध्ये गेला आहे. ते सहायक पोलिस निरीक्षक असताना पैठण, क्रांती चौक, रेल्वेस्टेशन, पैठण गेट, मोंढा नाका पोलिस चौकीमध्ये कार्यरत होते.
फोटो - नागेश्वरवाडीतील या अपार्टमेंटमध्ये तांबडे यांचा फ्लॅट आहे.