आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधी पोलिसांच्याच डोक्यावर दिसेल हेल्मेट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - उक्तीप्रमाणे कृती करणाऱ्यालाच दुसऱ्यांना सांगण्याचा नैतिक अधिकार मिळतो. हेल्मेट सक्तीबाबतही हा नियम लागू होतो, असे मत पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी व्यक्त केले. त्यामुळे आगामी काळात हेल्मेट सक्ती करताना त्यापूर्वी शहरातील हजार पोलिसांच्या डोक्यावर हेल्मेट दिसतील, असे संकेतच आयुक्तांनी सोमवारी आयोजित पोलिस मित्रांच्या सत्कार कार्यक्रमात दिले. शहरात गस्तीसाठी फिरणारे चार्ली, बीट मार्शल आणि अधिकारी यापुढे हेल्मेट घालतील, असे आयुक्तांनी सांगितले. त्यानंतर ही मोहीम सामान्य नागरिकांसाठी राबवण्यात येणार आहे. ही मोहीम राबवण्याच्या अगोदर दुचाकी चालवताना हेल्मेट किती आवश्यक आहे यासाठी समुपदेशन केले जाणार आहे. महाविद्यालयापासून या उपक्रमाची सुरुवात करण्यात येणार आहे.
११ जानेवारी रोजी वाहन रॅली
११जानेवारी रोजी शहर पोलिसांकडून वाहन रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीत सर्व पोलिस कर्मचारी हेल्मेट घालून सहभागी होणार आहेत. याशिवाय विविध पोलिस ठाण्यांतील पोलिस मित्रांनीही हेल्मेट घालून रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे. सकाळी दहा वाजता आयुक्तालयाच्या प्रांगणातून ही रॅली निघणार आहे.