आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सहा तास आधीच कळेल हवामानाचा अंदाज; संभाव्य नुकसान टाळणे शक्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- ऋतुचक्रबदलाचे कृषी, उद्योग, पर्यटन आदी घटकांवर विपरीत परिणाम होत आहेत. हवामानाच्या लहरीपणाचा सर्वाधिक फटका शेती आणि शेतकऱ्यांना बसत आहे. तो टाळण्यासाठी हवामानातील बदलाची अचूक नोंद घेऊन पूर्वानुमान वर्तवण्यासाठी भारतीय हवामानशास्त्र विभाग चिकलठाणा वेधशाळेत अर्धा एकर परिसरात ५० कोटी रुपये खर्चून डॉप्लर रडार यंत्रणा बसवणार आहे. ही यंत्रणा हवामानातील घटकांचे स्कॅनिंग करून सहा दिवस आधीच हवामानाचा अचूक अंदाज वर्तवणार आहे. त्यामुळे अवकाळी पाऊस, विजेचा प्रकोप, पूर, वादळे याची वेळीच पूर्वकल्पना मिळाल्याने संभाव्य नुकसान टाळणे शक्य होणार आहे.

 

ग्लोबल वॉर्मिंग वनाच्छादित क्षेत्रांचा अभाव असल्याने हवामानात अनपेक्षित वेगाने बदल होत आहेत. पावसाळ्यातील अनिश्चित पर्जन्यमानाचे प्रमाण वाढले आहे. त्याची शेतकऱ्यांना अगोदर माहिती मिळत नाही. तसेच मान्सूनमध्ये काही वेळेतच धो धो पाऊस पडून जातो. खंडाचे प्रमाण स्थलनिहाय पावसाच्या वितरणात कमालीचा फरक आहे. काही ठिकाणी मुसळधार तर हाकेच्या अंतरावर थेंबही पडत नाही. यंदाही यापेक्षा वेगळी परिस्थिती नव्हती. कृषी विभाग, महसूल विभाग, विभागीय आयुक्त कार्यालयाकडून आज पडलेल्या पावसाची आकडेवारी दुसऱ्या दिवशी ऑनलाइन जाहीर केली जाते, तर तापमान, थंडी, बाष्पीभवन, हवेचा वेग, प्रदूषण आदींची माहितीच दिली जात नाही. भविष्यात हवामान कसे राहणार, महसूल मंडळात काय स्थिती राहील, याविषयी शेतकऱ्यांना पूर्वसूचना मिळत नाही. दुसरीकडे हवामान बदलानुसार पीक पद्धतीत बदल केल्यामुळे शेती तोट्यात चालली आहे. यामध्ये बदल करणे, वातावरणातील घटकांची अचूक नोंदी घेऊन बिनचूक अंदाज वर्तवण्यासाठी सरकारने चिकलठाणा वेधशाळेत अर्धा एकरावर डॉप्लर रडार बसवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी हालचालीला वेग आला असून जागा निश्चित होताच डॉप्लर रडार उभारले जाणार असल्याचे हवामान शास्त्रज्ञ पंढरीनाथ साळवे पाटील यांनी “दिव्य मराठी’ला सांगितले.


वीजपडून मराठवाड्यात एकूण ९५ जणांचे बळी गेले
प्रदूषण नियंत्रणासाठीही ठरणार उपयुक्त पुणेमहापालिका सफर यंत्रणेद्वारे मानवी आरोग्यावर परिणाम करणाऱ्या घटकांची तीव्रता नोंदवून उपाययोजना करते. औरंगाबाद महापालिकेकडे अशी कुठलीच यंत्रणा नाही. डॉप्लर रडार, स्काय रेडिओ मीटर, जीपीएस रेडिओ साउंड तंत्रज्ञानाद्वारे वाहन इतर घटकांद्वारे होणाऱ्या प्रदूषणाचे सूक्ष्म स्कॅनिंग होणार असल्याने अभ्यास करून त्याद्वारे उपाययोजना शक्य होणार आहे.


वादळवारे, पूर, गारपीट, चक्रीवादळ, पावसाच्या खंडाची मिळणार आगाऊ माहिती
चिकलठाण्यापासून २०० किलोमीटरच्या हवाई अंतर परिघातील औरंगाबादसह मराठवाड्यातील सर्व जिल्हे, सोलापूर, बुलडाणा, जळगाव, नाशिक, नगर आदी जिल्ह्यातील बहुतांश गावांतील तापमान, थंडी, आर्द्रता, बाष्प, हवेचा वेग, ढगांचे अाच्छादन या घटकांची नोंद घेऊन विश्लेषणातून हवामानशास्त्रज्ञ दर तासांनी अचूक अंदाज बांधतील.

 


हा होईल फायदा
- डॉप्लर रडार बसवल्यानंतर बदलत्या हवामानातील घटकांचा अभ्यास करून दर सहा तासांनी वादळवारे, पाऊस, गारपीट, चक्रीवादळ, पावसाचा खंड आदींविषयी पूर्वसूचना मिळेल. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीपासून होणारे नुकसान कमी करण्यास मदत होईल.
- वीज पडण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या आकाशातील ढगांचे अचूक निरीक्षण करून विजा कुठे पडणार आहेत, त्याची लोकेशन नेटवर्कद्वारे पूर्वसूचना देण्याची सोय होणार असल्याने वीजबळी कमी करण्यास मोलाची मदत होणार आहे.

 

बातम्या आणखी आहेत...