आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घाटीत प्रवेशगृहापासून ओपीडीपर्यंत भिकाऱ्यांचे बस्तान, मनोरुग्णांचाही वेढा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घाटी अर्थात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय आता जणू भिक्षेकरीगृहच बनले आहे. प्रवेशद्वारापासूनच भिक्षेकऱ्यांनी जागा धरलेल्या आहेत. यातील काही भिकारी केवळ भीकच मागत नाहीत, तर येथे येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाइकांचीही वेगळ्या मार्गाने लूट करतात. याशिवाय मनोरुग्णांचाही त्रास वाढला आहे. भीक मागणे कायद्याने गुुन्हा आहे. मात्र, घाटीतील पोेलिस चौकीसमोरच भिकारी बसलेले असतात. घाटी प्रशासनासह पोलिसांनाही भिक्षा प्रतिबंधक कायद्याचा जणू विसरच पडला आहे.

१४ भिकारी, चार मनोरुग्ण
घाटीतीलडेंटल कॉलेजच्या समोरच पार्किंगची मोठी जागा आहे. येथे सिमेंट पत्र्याचे शेड आहे. याच ठिकाणी सर्वाधिक भिकारी बसलेले असतात. यात काही जोडपे आहेत, तर काही जण एकेकटेच आहेत. पुढे अपघात विभाग आणि मेडिसीन विभागाच्या इमारतीसमोरही भिकारी बसलेले असतात. जीवनजागृती सामाजिक वैद्यकीय फाउंडेशनने केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे येथे १४ भिकारी चार मनोरुग्ण आहेत.

खाण्यापिण्यासह पैसेही मिळतात
घाटीमध्येअनेक सामाजिक संस्था, संघटना रोज मोफत खिचडी अन्य पदार्थांचे वाटप करतात. येथे राहणाऱ्या भिकाऱ्यांची गुजराण या खिचडीवरच होते. शिवाय दिवसभरात भीकही मिळते. तसेच सणावाराला गोडधोड जेवण मिळते. झोपण्यासाठी पत्र्यांचे शेड असतेच. त्यामुळे येथून भिकारी बाहेर जात नाहीत. जीवनजागृती संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी या भिकाऱ्यांची रात्रनिवाऱ्यांमध्ये अन्न, वस्त्र निवाऱ्याची सोय करण्याची तयारी दर्शवली. मात्र, यातील केवळ दोघांनीच रात्रनिवाऱ्यात येण्यास होकार दर्शवला. बाकीच्यांनी घाटीच्या परिसरात राहणेच पसंत केले.

पिग्मीतून गुंतवणूक
रोजसायंकाळी सहा वाजता या परिसरात एक पिग्मी एजंट येतो. या एजंटकडे काही भिकारी पैसे देतात. दिवसभर भीक मागून जमवलेली रक्कम पिग्मीच्या माध्यमातून गुंतवली जाते. याशिवाय काही भिकारी संध्याकाळी शौकपाणीही करतात.

पोलिस चौकीच्या खिडकीवर दगडांची रांग
भिकाऱ्यांप्रमाणेचयेथे मनोरुग्णांचा त्रास आहे. घाटीतील मनोविकृती विभागाची आयपीडी बंद असल्याने चार रुग्ण घाटीच्या आवारातच फिरत राहतात. एका मनोरुग्ण महिलेने तर पोलिस चौकीच्या खिडकीवर दगडांची रांग तयार केली आहे. कुणी काही बोलले की लगेच त्यातले दगड ती समोरच्या व्यक्तींवर भिरकावते.

छेडछाडीच्या बहाण्याने लूट
काहीभिकारी महिला संध्याकाळी ओपीडीच्या दारामध्ये झोपतात. येथेच अॅडमिट असलेल्या रुग्णांचे नातेवाईकही झोपलेले असतात. मध्यरात्रीच्या सुमारास रुग्णांच्या नातेवाइकांनी छेड काढली, असा खोटा कांगावा करून या महिला संबंधित व्यक्तींना मारहाण करून पैसेही लुटत असल्याचे शहरी बेघर निवारा केंद्राचे संचालक प्रशांत गायकवाड यांनी डीबी स्टारला सांगितले.

दोघेच निवारागृहात आले
भिकाऱ्यांचे पुनर्वसनकरण्यासाठी घाटी परिसरात सर्वेक्षण केले. यात १४ भिकारी चार मनोरुग्ण आढळले. केवळ दोघांनीच रात्रनिवारामध्ये येण्याची इच्छा व्यक्त केली. -डॉ. फारुक पटेल, डॉ.सुनील पगडे, जीवनजागृती वैद्यकीय सामाजिक संस्था

ही गंभीर बाब
याबाबतपूर्णमाहिती घेतो. छेडछाडीच्या बहाण्याने रुग्णांच्या नातेवाइकांची लूट होत असेल तर गंभीर आहे. भिक्षा प्रतिबंधक कायद्यानुसार त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्न करू. - अमितेशकुमार, पोलिस आयुक्त

सीपींना पत्र देणार
हे खरे आहे की घाटीच्या परिसरामध्ये भिक्षेकऱ्यांची संख्या खूप वाढली आहे. याबाबत आम्ही पोलिस आयुक्तांना पत्र देऊ. पोलिसांच्या मदतीने भिक्षेकऱ्यांना या भागात प्रतिबंध करण्यात येईल. - डॉ.चंद्रकांत म्हस्के, अधिष्ठाता,घाटी
बातम्या आणखी आहेत...