आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काही तासांच्या ओळखीवर विश्वास ठेवल्याने गेले प्राण,

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पडेगाव येथील सरोश शाळेजवळ रविवारी अक्षय गुळसकर (२३) याचा खून झाला हाेता. या खुनातील दुसऱ्या आरोपीचे नाव मंगळवारी समोर आले. सोमवारी पकडण्यात आलेला मुख्य आराेपी जावेद वसीम खान याने त्याचा सहकारी समद बाबा (३०, रा. बीड बायपास) याच्या मदतीने खून केल्याचे कबूल केेले. समद फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
मित्रासोबत जेवण करत असताना अक्षयची जावेदसोबत ओळख झाली होती. काही तासांत झालेल्या ओळखीतून विश्वास ठेवल्याने अक्षयला जीव गमवावा लागला. खुनानंतर बारा तासांच्या आत पोलिसांनी जावेदला अटक केली होती. त्याने जुन्या भांडणातील सहकाऱ्यांना यात गोवण्यासाठी खोटी नावे सांगत मंगळवारपर्यंत पोलिसांची दिशाभूल केली. दोन दिवसांच्या चौकशीत त्याने एका सहकाऱ्यासोबत पैशांसाठीच खून केल्याचे कबूल केले. पडेगाव परिसरात पार्टी केल्यानंतर जावेदने त्याच्याकडे पैशांची मागणी केली. वाद होऊन झालेल्या झटापटीत आरोपींनी अक्षयचा गळा िचरला. अक्षय, त्याचे मित्र जावेदने अंडाभुर्जी खाल्लेल्या हातगाडीचालकाला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते. सहायक पोलिस आयुक्त नागनाथ कोडे पोलिस निरीक्षक इंद्रसिंग बहुरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

खोटीनावे सांगितली : चारमहिन्यांपूर्वी जावेदचे छोटे खान, असद इतर एकाविरोधात भांडण झाले होते. पडेगाव परिसरातच त्यांचे वाद झाले होते. त्या वेळी त्यांनी छावणी पोलिस ठाण्यात एकमेकांविरोधात तक्रारी दिल्या होत्या. सोमवारी पोलिसांनी जावेदला ताब्यात घेतल्यानंतर आपल्यासोबत चार ते पाच जण असल्याचे सांगितले. ही सर्व नावे त्याचे पूर्वी वाद झालेल्या सहकाऱ्यांची होती. त्यांना या गुन्ह्यात गोवण्यासाठी खोटी नावे सांगितली.
बातम्या आणखी आहेत...