आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रांगोळ्यांतून दिला "स्वच्छता' व "बेटी बचाओ'चा संदेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सिडको एन-५ मधील अरुणोदय कॉलनीतील सिद्धिविनायक मंदिरात शुक्रवारी गणेश जयंती साजरी करण्यात आली. या वेळी कॉलनीत विविध कार्यक्रम घेण्यात आले. त्यामध्ये महिलांनी मोठ्या उत्साहाने भाग घेतला. शोभायात्रेत चिमुकल्यांनी फॅन्सी ड्रेस परिधान करून भाग घेतला.

गणेश जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात सकाळी गणेश याग, हवन तसेच कलश शोभायात्रा काढण्यात आली. त्यानंतर फॅन्सी ड्रेस आणि रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. रांगोळीतून महिलांनी सामाजिक संदेश दिले. यामध्ये चंदा राजपूत आणि प्रियंका राजपूत या बहिणींनी स्वच्छ भारत अभियानावर रांगोळी काढली. यामध्ये त्यांनी "हमारा भारत स्वच्छ भारत', "स्वच्छता का दीप जलायेंगे', "चारों और उजियाला फैलायेंगे', "हर सपना सच करेगा इंडिया', "बनेगा स्वच्छ इंडिया', असा संदेश दिला. दुसऱ्या रांगोळीत स्वच्छतागृह, घनकचरा, ओला कचऱ्याचा संदेश देण्यात आला. इतर रांगोळीत "हुंडाबंदी', "बेटी बचाव' असा संदेश देण्यात आला. यामध्ये सिद्धिविनायक मंदिर समितीतर्फे उत्कृष्ट रांगोळ्यांना बक्षीस देण्यात आले. यामध्ये प्रथम १ हजार, दुसरे ५०१, तर तिसऱ्या क्रमांकाला २५१ रुपये देण्यात आले.