आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

EXCLUSIVE: आशीर्वाद हवा असेल तर भगवानगडाच्या नादी लागू नका; नामदेव शास्त्रींचा पंकजा मुंडेंना इशारा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- 'गत दसऱ्याला झालेल्या मेळाव्यात मला बारामतीचा दलाल म्हणून हिणवले. प्रचंड त्रास दिला. आता पुन्हा भगवानगडाच्या विकासासाठी निधी देण्याची तयारी असल्याचे सांगता. हा प्रकार म्हणजे केवळ पुन्हा दसरा जवळ येत असल्याने दाणे टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण, लक्षात ठेवा, आशीर्वाद हवा असेल तर पुन्हा भगवानगडाच्या नादी लागू नका,' असा इशारा भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना दिला. नामदेव शास्त्री यांनी आज (गुरुवारी) 'दिव्य मराठी'शी संवाद साधला.

बीड जिल्ह्यातील वारणी (ता. शिरूर कासार) येथे अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगताप्रसंगी पंकजा मुंडे यांनी भगवानगडाच्या विकासासाठी प्रयत्न करण्याबाबत वक्तव्य केले होते. त्या म्हणाल्या होत्या, "ग्रामविकास विभागाकडून नारायणगडासाठी २५ कोटी तर गहिनीनाथ गडासाठी ३७ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. याच धर्तीवर भगवानगडाच्या विकासासाठीही आपली एक पाऊल मागे येण्याची तयारी आहे. महंतांना मी नको असेल तर जलसंधारणमंत्री राम शिंदेंना पाठवते,” असे सांगून त्यांनी गतवर्षी दसरा मेळाव्यावरून झालेल्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता.

नामदेव शास्त्री म्हणाले, सध्या गड शांत आहे, असाच शांत राहू द्या, वाचा पुढील स्लाइडवर...

हेही वाचा...

>EXCLUSIVE: पुन्हा पुन्हा गोपीनाथगडाचा विषय का? महंतांना विचारूनच ठरवले नाव- पंकजा मुंडे
> EXCLUSIVE: पंकजांनी भगवानगडावर भाषणाचा नाद सोडावा, महंतांची सशर्त तडजोडीची तयारी
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...