आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घडामोडींनंतर घडामोडेच ठरले महापौरपदाचे उमेदवार, शेवटच्या क्षणी राजू शिंदे यांना दिली मात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - साडेदहा महिन्यांसाठी भाजपचे भगवान घडामोडे हे औरंगाबादचे महापौर असतील हे नक्की झाले. शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवार ठरत नव्हता. प्रदेशाध्यक्ष, खासदार रावसाहेब दानवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात शनिवारी पहाटे दोन वाजेपर्यंत काथ्याकूट झाला. ज्येष्ठांपैकी घडामोडे राजू शिंदे हे स्पर्धेत होते. अखेर पहाटे दोनच्या ठोक्याला घडामोडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. शिवसेनेने उपमहापौरपदासाठी मराठा उमेदवार दिला म्हणून भाजपनेही मराठाच उमेदवार द्यावा, अशी मागणी होती. परंतु बैठकीत यावर विचारच झाला नाही. पक्षातील ज्येष्ठता याच निकषावर निर्णय घेण्यात आला. महापौरपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले असताना आरक्षित प्रवर्गाच्या उमेदवाराला संधी देण्याचे भाजपचे हे वेगळे सोशल इंजिनिअरिंग ठरले.
साडेसात वर्षांनंतर भाजपकडे महापौरपद येत आहे. त्यामुळे हे पद मिळवण्यासाठी मोठी स्पर्धा होती. परंतु पक्षाने फक्त नि फक्त ज्येष्ठ नगरसेवकांचाच यासाठी विचार चालवला होता. यात शिंदे घडामोडे हेच अंतिम स्पर्धेत होते. मात्र दोघांतून कोण हे मात्र नक्की होत नव्हते. अखेर दानवे यांच्या सूचनेवरून घडामोडे यांचे नाव नक्की करण्यात आले.
प्रचंड घडामोडींनंतर घडामोडेच ठरले महापौरपदाचे उमेदवार
नगरसेवक राहिले आहेत. त्यांना यापूर्वी उपमहापौर म्हणून संधीही देण्यात आली ही त्यांची बाजू मुख्यमंत्र्यांकडे मांडण्यात आली. या पदासाठी बुधवारी मतदान होणार असून रविवारपासून युतीचे नगरसेवक सहलीवर रवाना होत आहेत.

संयुक्तपणेभरले उमेदवारी अर्ज : भाजपकडून महापौरपदासाठी तर शिवसेनेकडून उपमहापौरपदासाठी दुपारी १२ वाजता संयुक्तपणे अर्ज भरण्यात आले. खासदार चंद्रकांत खैरे, आमदार संजय शिरसाट, महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, आमदार अतुल सावे, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांच्या उपस्थितीत घडामोडे स्मिता घोेगरे यांनी उमेदवारी अर्ज भरले. युतीकडे स्पष्ट बहुमत असल्याने त्यांची निवड निश्चित मानली जाते. महापौरपदाच्या स्पर्धेत असलेले भाजपचे सर्व नगरसेवक उमेदवारी अर्ज भरताना हजर होते.

काँग्रेस-एमआयएमचे उमेदवार
एमआयएमकडून महापौरपदासाठी सायराबानो तर उपमहापौरपदासाठी खान इर्शाद इब्राहिम यांनी उमेदवारी अर्ज भरला. काँग्रेसकडून महापौरपदासाठी अय्युब खान तर उपमहापौरपदासाठी नावेद खान यांनी अर्ज सादर केला. अपक्ष नगरसेविका कीर्ती शिंदे यांनी अर्ज घेतले होते. परंतु त्यांनी अर्ज भरले नाहीत.
बातम्या आणखी आहेत...