आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रांती चौक-रेल्वेस्टेशन रस्त्याचे काम पुन्हा बंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी 31 डिसेंबरपर्यंत कोणत्याही परिस्थितीत क्रांती चौक ते रेल्वेस्टेशन रस्त्याचे काम पूर्ण होईल, असे सांगितले असले तरी प्रत्यक्षात हे काम पुन्हा रेंगाळले आहे. गेल्या 13 दिवसांपासून रस्त्याचे काम बंद पडले असून कंत्राटदाराने पैसे न मिळाल्याने हे काम थांबवले आहे.

क्रांती चौक ते रेल्वेस्टेशन रस्ता प्रारंभीपासूनच मनपासाठी डोकेदुखीचा ठरला आहे. नानाविध अडथळ्यांची शर्यत पार करत या रस्त्याच्या कामाला मागील महिन्यात आयुक्तांनी वेग दिला होता. दर आठवड्याला या रस्त्यासंदर्भात बैठक घेऊ व या कामातील अडथळे दूर करून 31 डिसेंबरपर्यंत काम पूर्ण केले जाईल, असे आयुक्तांनी सांगितले होते. मात्र, ही डेडलाइनही पाळली जाणार नाही, असे चित्र दिसत आहे.

गेल्या 13 दिवसांपासून या रस्त्याचे काम थांबले आहे. भाजप कार्यालयासमोरचा भाग, एसएससी बोर्ड ते कोकणवाडी आणि दुसर्‍या बाजूने कोकणवाडी ते बन्सीलालनगर असे काँक्रिटीकरणाचे काम झाले आहे. मात्र, इतर काम आता पूर्ण थांबले आहे. या संदर्भात जीएनआय इन्फ्राचे हरविंदरसिंग यांनी सांगितले की, बिलाबाबतची तक्रार आम्ही आयुक्तांच्या कानावर टाकली आहे. त्यावर निर्णय होणे बाकी आहे.